‘पैशांसाठी निर्मात्याशी केलं दुसरं लग्न…’, दाक्षिणात्य अभिनेत्री नेटकऱ्यांकडून ट्रोल

Uncategorized

South Actress Mahalakshmi and Ravindar Chandrasekaran Trolled For Wedding : दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीनं (Mahalakshmi) निर्माता रवींद्र चंद्रशेखर (Ravindar Chandrasekaran) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्या लग्नावर सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

   

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर कमेंट करत काही नेटकरी हे त्यांचं खरं प्रेम आहे असे म्हणत ट्रोल करत आहेत, तर काही नेटकरी महालक्ष्मीनं पैशासाठी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. 

महालक्ष्मीनं निर्माता रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केलं. त्यांचे काही फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. खरंतर महालक्ष्मीनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत “We are not made for each other we are mad for each other.” असे कॅप्शन तिनं दिलं होतं.

हे वाचा:   करणने करिनाला वैयक्तिक प्रश्न विचारला, साइज मुळे काही फरक पडतो का? यावर करिनाने हे मजेशीर उत्तर दिले

दरम्यान, महालक्ष्मी आणि रवींद्र यांचे फोटो पाहता नेटकऱ्यांनी त्यांना वेगवेगळी नावं दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, मोटू और पतलू की जोडी. दुसरा नेटकरी म्हणाला, पैसा असेल तर काहीही होऊ शकतं. तिसरा नेटकरी म्हणाला, एकमेकांच्या प्रेमात वेडे नाही तर पैशांची ताकद आहे. 

दरम्यान, असे म्हटले जाते की महालक्ष्मीचे पहिल्या लग्नात वाद सुरु होते. त्यानंतर महालक्ष्मीनं पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर महालक्ष्मीनं निर्माता रवींद्र यांच्यासोबत लग्न करत सगळ्यांना सुखद धक्का दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट ‘विद्युम वरई कथिरू’ चित्रपटादरम्यान झाली होती. या सेटवर त्यांची मैत्री झाली, त्यानंतर ते सतत भेटू लागले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, रवींद्रशी लग्न करत मी भाग्यवान आहे असे महालक्ष्मीनं म्हटलं. 

हे वाचा:   संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

सतत होणाऱ्या ट्रोलिंगला पाहत असले तरी देखील महालक्ष्मी आणि रवींद्र एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी रविंद्रनं महालक्ष्मीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा त्यानं कॅप्शन दिलं होत की ‘माझ्या आयुष्यातील 8 वे आश्चर्य’ यावर उत्तर देत महालक्ष्मीनं लोक काहीही म्हणत असले तरी, ‘माझ्या हृदयाची धडधड होईपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. तुझ्याशिवाय मी नाही… तुच माझं सर्वस्व आहे.’ 

Leave a Reply