भाईजानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा; म्हणाली, ‘सलमान खान याने मला…’

Uncategorized

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर, कायम तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे चर्चेत असते. मलायकाने पहिलं लग्न अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत केलं. मलायका आणि अरबाज यांची ओळख एका फोटोशूट दरम्यान झाली होती. असं सांगितलं जातं.

पहिल्या ओळखीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९१ मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अरबाज आणि मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान आहे. अरहान सध्या परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे.

अरबाज आणि मलायका यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या १९ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले. अरबाज आणि मलायका यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका तुफान चर्चेत आली. एवढंच नाही तर, एक वेळ अशी आली, जेव्हा मलाकाला इंडस्ट्रीमध्ये जे स्थान निर्माण केलंय ते स्वबळावर केलं असल्याचं सांगण्याची वेळ आली.

हे वाचा:   “दादा गुटखा खातात…” कथित बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केल्याने सई ताम्हणकर ट्रोल

इंडस्ट्रीची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिने मलायकावर निशाण साधला होता. अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबातील असल्यामुळे मलायकावर आयटम गर्लचा ठपका लागला नाही, असं राखीने म्हटलं होतं. राखीने साधलेल्या निशाण्यावर मलायकाने देखील सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे मलायका प्रचंड चर्चेत आली होती.

खान कुटुंबातील असल्यामुळे मलायकाला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळाली असल्याचा आक्षेप देखील राखीने मलायकावर घेतला होता. यावर संताप व्यक्त करत मलायका म्हणाली, ‘असं असतं तर मला सलमान खान याच्या प्रत्येक सिनेमात आयटम सॉन्ग करायला हवा होता. मी स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलं आहे.

मला सलमान खान याने घडवलेलं नाही…’ असं देखील मलायका म्हणाली.मलायकाने आतापर्यंत अनेक सिनेमांत आयटम सॉन्ग करत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दिल से’ सिनेमात ‘छय्या-छय्या’ आणि ‘दबंग’ सिनेमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर आयटम सॉन्ग केला होता. मलायकाच्या या गाण्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. मलायका कायम तिच्या डान्स आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते.

हे वाचा:   अबब.. ! आपल्या दोन्ही पत्नींचे एकत्रच केले डोहाळजेवण...अरमान मलिकच्या पत्नींचे फोटो पाहून आश्चर्य वाटेल..दोघीही एकत्र राहतात

मलायकाने अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही वर्षांपूर्वी मलायका आणि अर्जुन यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. आता अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात.

Leave a Reply