सलमान खानने माझ्या डोक्यात बाटली फोडली हे…” या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

Uncategorized

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची क्रेझ आजही तितकीच आहे. तब्बल ३ दशकं सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सलमानच्या कॉंट्रोवर्सी आणि लव्ह लाईफ या दोन गोष्टींची चर्चा आजही प्रचंड होते. वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडलं गेलं, बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींना त्यांचा जोडीदार सापडला. पण या अभिनेत्रींना डेट करूनही सगळ्यांचा लाडका भाईजान अजूनही सिंगलच आहे.

   

सलमान खानच्या अफेअर्सबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. नुकतंच सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सलमानबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. १९९३ मध्ये सोमी आणि सलमान रिलेशनशीपमध्ये होते, काही दिवसांनी ते वेगळे झाले.

यामागे प्रामुख्याने सलमानची गैरवर्तणूक हे कारण असल्याचं समोर आलं होतं.सोमी अलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळे फोटो पोस्ट करत तिची याविषयीची मुलाखत शेअर केली आहे.

हे वाचा:   ‘कुछ कुछ होता है’ मधली छोटी ‘अंजली’ आठवतेय? आता ‘या’ हॉलिवूड कलाकाराशी केला साखरपुडा

लहानपणी झालेलं शोषण आणि त्यानंतर सलमानबरोबर असताना झालेलं शोषण याबद्दल तिने भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये सलमान तिला सिगरेटचे चटके द्यायचा, लैंगिक आणि शारीरिक शोषण करायचा असे गंभीर आरोप लावले आहेत.

जेव्हा सोमीने याबद्दल आधी भाष्य केलं होतं तेव्हा सलमानने तिच्या डोक्यात एक बाटली फोडल्याच्या घटनेबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या घटनेतील तथ्य सोमीने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.याविषयी सोमी म्हणाली, “जर माझ्या डोक्यावर त्याने बाटली फोडली असती तर मला रुग्णालयात जावं लागलं असतं.

त्याने माझ्या डोक्यावर कोल्डड्रिंकचा ग्लास रिकामा केला होता कारण त्यात दारू होती, मी तेव्हा पहिल्यांदा दारू ट्राय करणार होते. तेव्हा माझ्याबरोबर माझी एक मैत्रीणही होती, तिने हे सगळं पाहिलं आहे. मी तिचं नाव घेऊ शकत नाही, पण तेव्हा त्याने माझ्या डोक्यात बाटली फोडली हे धादांत खोटं आहे.

हे वाचा:   अबब.. ! आपल्या दोन्ही पत्नींचे एकत्रच केले डोहाळजेवण...अरमान मलिकच्या पत्नींचे फोटो पाहून आश्चर्य वाटेल..दोघीही एकत्र राहतात

”सलमानबरोबर रिलेशनशीपमध्ये असताना सोमीने बऱ्याच गोष्टी, अत्याचार सहन केल्या आहेत. याविषयीच तिने उघडपणे भाष्य केलं आहे. सलमान तिच्याशी जे वागला आहे ते ती अजूनही विसरलेली नाही, आजही ते विचार तिची झोप उडवतात असंही तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

Leave a Reply