प्रिती झिंटाने खूप दिवसांनी उघडले तिच्या आणि युवराज सिंगच्या नात्याचे गुपित, म्हणाली- ‘युवराज आणि मी दोघे…’, जाणून घ्या सत्य

Uncategorized

प्रिती झिंटाला बॉलिवूडची ‘डिंपल क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. ९० च्या दशकात प्रीती झिंटाने रुपेरी पडद्यावर राज्य केले होते. या अभिनेत्रीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ज्या वेळी इतर अभिनेत्री अपारंपरिक पात्रे साकारण्यास कचरत होत्या, अशा वेळी प्रीती झिंटाने अशा पात्रांची प्रशंसा केली. अभिनयासोबतच प्रीती तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळेही चर्चेत होती. या अभिनेत्रीचे नाव बॉलिवूड कलाकारांपासून ते उद्योगपती आणि भारतीय क्रिकेटपटूंशी जोडले गेले आहे.

   

आपल्या बोल्ड आणि स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाणारी प्रीती झिंटा प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. मग ती अभिनेत्रींच्या नात्याची बातमी असो की अंडरवर्ल्डकडून आलेल्या धमक्या. आयपीएलमध्ये संघ खरेदी करणारी प्रीती झिंटा ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. आयपीएल दरम्यान या अभिनेत्रीचे नाव एका प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूसोबतही जोडले गेले आहे.

हे वाचा:   “आम्ही एकत्र रुमवर…” दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने त्यांच्या नात्याबद्दल केला खुलासा

युवराज आणि प्रीती यांच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या

आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये युवराज सिंग आणि प्रीती डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. युवराज सिंग प्रीती झिंटाच्या टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता. त्यामुळे दोघांनाही अनेकदा मॅचदरम्यान एकत्र दिसले होते. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत प्रीती म्हणाली होती की ती खूप खाजगी व्यक्ती आहे आणि जेव्हा लोक तिला न विचारता तिच्याबद्दल इतक्या गोष्टी प्रकाशित करतात तेव्हा आश्चर्यचकित होते.

प्रितीने युवराज आणि ब्रेटलीला तिचा भाऊ म्हणून सांगितले

या अभिनेत्रीने पुढे म्हटले होते की, सध्या ती या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नसली तरी तिच्या आणि युवराज सिंगबद्दल जे काही लिहिले गेले आहे, त्यामुळे ती खूप दुखावली गेली आहे. प्रितीने पुढे युवराज सिंग आणि ब्रेट लीला तिचे भाऊ म्हणून सांगितले होते. रक्षाबंधनाच्या दिवशी ती स्वतः जाऊन युवराज आणि ब्रेट ली यांना राखी बांधते, असे या अभिनेत्रीने सांगितले होते.

हे वाचा:   “मी कुठे व्हर्जिन…” दोन वेळा घटस्फोट झालेल्या पुरुषाबरोबर लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट

आज युवराज सिंग आणि प्रीती झिंटा या दोघांनीही आपापल्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे. प्रितीने जीन गुडइनफशी लग्न केले आणि आज हे जोडपे दोन जुळ्या मुलांचे पालक आहेत. तर युवराज सिंगने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले होते आणि सध्या युवराज आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.

Leave a Reply