लग्नाआधीच गरोदर राहिली कियारा? स्कार्फने स्वतःला झाकून घेतल्याने प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचं नुकतंच मोठ्या थाटामाटात जैसलमेर इथं लग्न झालं. नवदांपत्या दिल्लीला आल्यानंतर दोघांचं मल्होत्रा कुटुंबानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कियारा सध्या तिच्या सासरी लग्नानंतरच्या काही विधींमध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये व्यग्र आहे. असं असताना सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे लग्नाआधी कियारा प्रेग्नंट होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी कियारा आणि सिद्धार्थला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या ट्रोल करणाऱ्यांना दोघांच्या चाहत्यांनी सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

   

कियारा आडवाणी (Kiara Advani)आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. दोघंजण लग्नानंतर खूपच आनंदात आहेत. त्या दोघांवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा भरभरून वर्षाव करत आहेत. असं सगळं असताना सोशल मीडियावर काही जण कियाराबाबत अफवा पसरवत आहेत. काहींच्या मते कियारा लग्नाआधीच प्रेग्नंट आहे.

हे वाचा:   अंजली अरोराने बाथरूममध्ये कपडे काढून केला डान्स , पाहा नवीन व्हिडिओ व्हायरल

कियारा तिचं पोटं झाकत आहे का?

एका नेटकऱ्यानं लिहिलं की ‘मला तर असं वाटतं आहे की तीन महिन्यांत तिच्या प्रेग्नंसीची बातमी नक्कीच येईल. जिथं जिथं ती जात आहे, तिथं तिथं ती तिचं पोट झाकत आहे. हे कलाकार मंडळी लोकांना वेडं समजतात का?’

तर अन्य एका युजरनं विचारलं आहे की, ‘असं जर नाही तर कियारा तिचा पोट का झाकत आहे. लग्नासाठी ती जैसलमेरला गेली तेव्हादेखील गुलाबी स्कार्फनं पोट झाकलं होतं आणि लग्नानंतर काळ्या स्कार्फनं झाकलं होतं. हे प्रकरण नेमकं काय आहे?’

हे वाचा:   वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक,फोटो पाहून चाहते थक्क,पाहा Photos

रिया नावाच्या एका युजरनं लिहिलं की, ‘खरंच कियारा आडवाणी प्रेग्नंट आहे का? ती स्कार्फनं तिचं पोट का झाकत आहे. नववधू स्कार्फमुळे अडकली आहे.’ तर काही नेटकऱ्यांनी कियाराच्या फॅशनवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच पैस खर्च करण्याचा फायदा काय आहे, कारण तिनं साधी चप्पल घातली आहे. नवी नवरी आहे तरी असे कपडे तिनं घातले आहेत.

कियाराच्या चाहत्यांनी दिला पाठिंबा

कियारा आडवाणीच्या प्रेग्नंसीसंदर्भात होणाऱ्या या अफवांना आणि टीकाकारांना तिच्याच चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एका युझरनं तर लिहिलं की, ‘ एखाद्या मुलीला जज करणारे तुम्ही कोण आहात. तुम्ही डॉक्टर आहात की एखादी आई. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवताना काहीच वाटत नाही?’

Leave a Reply