स्वामी सांगतात ज्या घरात अश्या स्त्रिया असतात त्या घरात भिकारी सुद्धा राजा बनतो..

अध्यात्म

असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच. प्रत्येक पुरुषाला वाटत की जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल. ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे हे घर स्वर्ग व्हावे. त्याचबरोबर तिने आपल्या घराची व कुटुंबाची चांगली काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यात आनंद आणावा. काही पुरुषाच्या बाबतीत हे खरे देखील होते.

   

पण त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखर आनंद व भाग्य घेऊनच येते अस नाही. घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते ती घरातील स्त्री पुराणात अश्या स्त्रियांचे लक्षणे सांगितल्या आहेत. ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात ते स्त्री ज्या घरी लग्न करून जाते त्या घराला स्वर्ग बनवते.

पहिले लक्षण आहे. ध र्म मार्गावर चालणारी स्त्री म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंतांची, तुळशीची पूजा करते. त्याचबरोबर दररोज देवाजवळ व तुळशिजवळ दिवा लावते नैवेद्य दाखवते व त्यानंतर सर्वजण भोजन करतात. या स्त्रीमुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते.

व अश्या वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते. दुसरा गुण म्हणजे समाधानी स्त्री जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर समाधान मानते जास्त हव्यास करत नाही. तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो. काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ही यायला हवी असे वर्तन करतात.

हे वाचा:   या गोष्टी कधीही कोणाकडे मागू नका, पूर्ण कुटुंब बरबाद होते..आजच जाणून घ्या

यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतिच्या नाकीनव येत. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम सर्व कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा मर्यादित असतील तर त्या पूर्ण करताना तिच्या पतीला जास्त कष्ट जरावे लागत नाही. व घरातील वातावरण सुद्धा सुखी, समाधानी राहते.

तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धाडस असावे. कोणतीही परिस्थिती असली. तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकत त्या स्त्रीमध्ये असावी. व कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी. जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही.

चौथे गुण म्हणजे राग न येणे. तसं पाहायला गेलं तर हा गुण असणाऱ्या स्त्रीया मिळणे अवघड आहे. कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मताच स्वभाव आहे. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश्श आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत. थोडा फार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायला हवा त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फो ट होऊ शकतो.

हे वाचा:   अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू पैसा पाण्यासारखा येईल..शास्त्रात सांगितलेला धनलाभ उपाय..

व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी राग, चिडचिड करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वादविवाद होतात. म्हणून स्त्रीने संयमी व शांत असावेत.  पाचवा गुण समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणाने घेते व शांतपणे समजावून घेते. जे आहेत ते माझे आहे याचाच शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते.

अश्या स्त्रीमुळे घर देखील सुखी व आनंदी असते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बवते आणि सर्वांना समजून घेते. त्यामुळे वेळ प्रसंगी ते लोक तिच्या कुटुंबासाठी धावून येतात. तर अश्या स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरात भिकारी सुद्धा राजा बनतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply