नमस्कार मित्रांनो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी असे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत. आपल्या जीवनात वृक्षांचे, झाडा झुडपांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण काही झाडे ही आपण घराजवळ चुकीच्या पद्धतीने लावली तर त्याचा आपणास नक्कीच त्रास होतो. वास्तू शास्त्राच्या मते रोपे आणि झाडे घराच्या सुख, समृद्धीशी सं-बधीत असतात.
जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बऱ्याच अडचणींना कारणीभूत सुद्धा ठरतात. वास्तूशास्त्रामध्ये अंगणात किंवा घराभोवती रोपे लावण्याची मनाई करण्यात आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही रोपे,झाडे सांगणार आहे जी चुकून सुद्धा तुम्ही तुमच्या अंगणात किंवा घराच्या अवतीभोवती सुद्धा लावू नका.
काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात आणि बऱ्याच स-मस्यांना आमंत्रण देत असतात. म्हणून काटे असलेले कोणतेही झाड घरच्या अंगणात लावू नये कारण अशी झाडे घरातील त्रास आणि आर्थिक संकटे वाढतात. पण गुलाबाच झाड याला अपवाद आहे.
घराजवळ कोणी चिंचेच झाड लावू नये मान्यता आहे की चिंचेची लागवड केल्याने घरात रोग येत असतात याबरोबरच परस्पर सबंध सुद्धा खराब होतात. यामुळे घराचे वातावरण खराब होते तसेच नकारात्मक शक्तीचा प्रभाव देखील घरामध्ये वाढत जातो.
पिंपळाचे झाड अतिशय शुभ मानले जात असले, जरी त्याची पूजा केली जात असली तरी त्याची रोपे कधीही घराच्या आत किंवा घराच्या आसपास लावू नयेत. यामुळे पैश्याचे नुकसान होते. याचे कारण म्हणजे पिंपळाची मुळे दूरपर्यंत पसरतात ज्यामुळे ते घराच्या भिंतीला नुकसान पोहचवू शकतात. म्हणून जर आपण आपल्या घरात पिंपळाचे झाड लावले असेल तर ते काढून मंदिराच्या जवळ किंवा पवित्र ठिकाणी लावावे.
बरेच लोक घरात मदारची लागवड करतात परंतु ते वास्तूशास्त्रा नुसार चांगले मानले जात नाही. मदार सोबत अशी झाडे ज्यामधून दूध निघते म्हणजेच चिक निघते ते झाडे घरात लावू नये यामुळे नकारात्मकता येते. खजुराचे झाड नक्कीच घराचे सोंदर्य वाढवते परंतु ते लावणे टाळले पाहिजे. आपण हे झाड लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि कुटुंबात आर्थिक संकटे वाढतात.
यामुळे काही रोपे, झाडे चुकून सुद्धा आपण आपल्या अंगणात किंवा घराच्या अवतीभोवती लावली नाही पाहिजेत. असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.