घरात गरिबी आणतात या 5 चुका तुम्ही करू नका…घरात कधीच पैसा आणि शांती राहत नाही..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

या 5 चुका आपल्या घरामध्ये गरिबी घेऊन येतात. अनेकजण देवाला प्रश्न विचारतात की देवा मीच गरीब का? माझ्या घरामध्ये पैसे का येत नाही? कदाचित तुम्ही हा प्रश्न देवाला विचारण्या ऐवजी स्वतःला विचारायला हवा. कारण आपल्या हातून असे काही चुका होत असतात आपल्याला आशा काही चुकीच्या सवयी असतात की ज्यामुळे आपल्या घरात पैसा येत नाही.

घरात पैसा येण्यासाठी धन येण्यासाठी माता लक्ष्मीची सातत्याने पूजा करावी लागते. कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त काळ कधीच थांबत नाही. आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागतो. आज आपण आशा 5 चुका पाहणार आहोत ज्या 5 चुकीच्या सवयी माता लक्ष्मी ला रुष्ट करतात व माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जातात.

या पैकी पहिली सवय आहे. ती म्हणजे आपल्या घरात होणाऱ्या माता पित्यांचा आपमान ज्या घरात माता पित्यांचा आपमान होतो. त्या ठिकाणी तुम्ही कितीही देव देव करा पौर्णिमा, आमावस्याला कितीही उपाय व टोटके करा. कोणताही उपाय फलद्रूप होत नाही आशा घरामध्ये ईश्वराचा वास होत नाही. म्हणून आपण घरामध्ये माता पित्यांचा आपमान कधीही करू नये. तसेच घरातील महिलांचा सुद्धा आपमान करू नये.

हे वाचा:   चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ..चिमणी घरात आल्यास काय घडते ते जाणून घ्या !

दुसरी सवय अनेकांना बाहेरून घरात येताना ते थेट घरामध्ये येतात. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये एक सवय आहे की बाहेरून घरामध्ये येताना आपल्या पायावर पाणी घ्यावं आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा. याच कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता तेव्हा आपल्या सोबत अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आलेल्या असतात.

आणि जर या नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच ठेवायच्या असतील तर आपण आपल्या पायावर पाणी आवश्य घ्यावं. ज्या घरात व्यक्ती पायावर पाणी न घेता प्रवेश करतात त्या घरात मोठ्या प्रमाणात आजारपण निर्माण होत आणि या आजारपणाच कारण अनेक दृष्टीने आपण पाहू शकतो. अनेकांना अशी सवय असते की पायात घातलेली चप्पल किंवा बूट ती घराच्या आतमध्ये आणतात.

चप्पल किंवा बूट घरात घेऊन जाण ही चुकीची सवय आहे. तिसरी चूक आहे ती आपल्या हातून अनेकदा होते ती म्हणजे देव पूजा करताना अनेक जणांना जांभळी येते आळस देतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि असा आळस व जांभळी आपण आपल्या देव घरासमोर बसून देत असू तर या पेक्षा मोठी चूक दुसरी कोणतीही नाही.

हे वाचा:   या नावाच्या मुलींना मिळते स्वर्गाहुनी सुंदर सासर, जिथे त्या राहतात कायम सुखी.!

कारण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देवघरातून उत्पन्न होत असते. आणि म्हणून आशा या सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी आळस व जांभळी देत असू तर आपल्यावर ईश्वराची कृपा कधीच होत नाही. चौथी सवय लक्षात घ्या स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णाचा वास असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर माता अन्नपूर्णा देवीची कृपा होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन धान्याची कमतरता कधीच निर्माण होत नाही.

मात्र आपलं स्वयंपाक घर हे अस्ताव्यस्त पडलेले नसावं त्याठिकाणी स्वच्छता असावी. आपल्या स्वयंपाक घरात आठवड्यातून एकदा तरी गोड पदार्थ तयार करावा. विशेष करून शुक्रवारच्या दिवशी आपण खीर किंवा कुठला ही गोड पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण करावा. यामुळे आपल्या कुटुंबात सौख्य निर्माण होत.

पाचवी सवय ज्या ठिकाणी सुगंधीत वातावरण असते. त्या ठिकाणी दिव्य शक्तींचा वास असतो मग आपल्या ही घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवलं तर आपल्या ही घरात दिव्य शक्ती वास करू लागतात. ज्या ठिकाणी सुगंध असेल पवित्रता असेल व शुद्धता असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास आवश्य होतो.

Leave a Reply