मुळा खाल्ल्यानंतर या तीन गोष्टी खात असाल तर वेळीच व्हा सावधान नाहीतर ………

आरोग्य

मित्रांनो, आपण आपल्या आहारात सलाड खातो. यात कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, मुळा, कोबी यांचा समावेश होतो. त्यापैकी एक भाजी म्हणजे मुळा. मुळ्याची कोशिंबीर, मुळ्याची भाजी, मुळ्याचे पराठे असे मूळची विविध पदार्थ करून खातो. मुळा फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यातही भर घालतो. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेता येते.

   

मुळ्यामध्ये पाणी, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर टोटल डएटरी साखर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम झिंक कॉपर मँगनीज फ्लोराईड ही सगळी मिनरल्स असून विटामिन सी, थियामिन नियासिन कॉलीन बीटा विटामिन ए, आययू विटामिन के, ल्यूटिनदेखील आढळतात. जे तुमच्या शरीराला आवश्यक आहे.

मुळ्याचा उपयोग हृदयविकार, मधुमेह, मुतखडा अशा विविध आजारांमध्ये करता येतो. तसेच मुळा याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळ्याच्या सेवनाने वजनही कमी होते असे भरपूर फायदे मुळा खाल्ल्याने आपल्या आरोग्यास होतात.

परंतु मित्रांनो, मुळा जेव्हा आपण खातो तेव्हा त्यासोबत काही गोष्टी खान चुकीच आहे. कारण मुळा आणि त्या पदार्थाच्या एकत्रित गुणधर्मामुळे त्याचे आपल्याला विपरीत परिणाम भोगावे लागतात. चला तर पाहूया आपण त्यापैकी काही पदार्थ

हे वाचा:   आयुष्यात कधीही पित्त, गॅस, अपचन आणि पोट साफ होण्यासाठी गोळी घ्यावी लागणार नाही..फक्त हा सोपा उपाय..शरीरातील उष्णता लगेच कमी होईल..

यातला पहिला पदार्थ म्हणजे संत्री. संत्रा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी असतं. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते यात अँटिऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मूळ्यामध्ये देखील अँटिऑक्सिडंट असतात. जेव्हा आपण हे दोन पदार्थ खातो तेव्हा या अँटिऑक्सिडंट एकमेकांशी प्रतिक्रिया होते आणि त्याच्या परिणामी आपल्या पोटामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात पोटाच्या समस्या निर्माण होतात. पोट फुगणे, पित्तवाढणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच वजन वाढण्याची शक्यता असते म्हणून मुळा खाण्यापूर्वी संत्र्याचे सेवन करू नये आणि मुळा खाल्ल्यानंतर देखील खाऊ नये.

मित्रांनो यातील दुसरा पदार्थ आहे कारलं. मुळा आणि कारलं एकाच वेळी खाल्लं तर असं दोघांचे मिश्रण होतं. त्यामुळे आपल्याला अनेक गंभीर प्रकारचे परिणाम होऊ शकतात सर्वात गंभीर परिणाम आहे तो म्हणजे आपलं बीपी खूप वेगाने वाढू शकत यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आपण मुळा खाल्यानंतर किमान 24 तास म्हणजे पूर्ण एक दिवस कारल्याची भाजी खाऊ नका.

तिसरा पदार्थ आहे दूध. दुध हे देखील मुळा खाण्यापूर्वी गोळ्या सोबत किंवा मुळा खाल्ल्यानंतर दूध अजिबात पिऊ नये. कारण दूध प्राणीजन्य पदार्थ आहे म्हणजे प्राण्यापासून दूध मिळते आणि मुळा ही वनस्पती आहे. दोघांचे गुणधर्म वेगळे आहे आहेत. हे दोन पदार्थ एकत्र येतात त्यावेळी आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन येतात. फार पूर्वीपासून किंवा आपले पूर्वज असे म्हणत होती की दूध आणि मुळा एकत्र खाल्ल्याने अंगावर कोड फुटू शकते म्हणजे अंगावरती पांढरे डाग येण्यास सुरुवात होते किंवा गुलाबी रंगाचे डाग येण्यास सुरुवात होते.

हे वाचा:   या बियांच्या तेलाने शेक घ्या पाच दिवसात १००% पोटावरील चरबी कमी करणारा या तेलाचा जबरदस्त घरगुती उपाय !

मित्रांनो संत्री कारलं आणि दुध हे तीन पदार्थ मुळ्या सोबत खाल्ल्याने त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात. याची माहिती आपणास मिळाली आहे तेव्हा आजपासून नव्हे आत्तापासूनच लक्षात ठेवा की मुळा खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर 24 तास वरील तीन पदार्थ अजिबात खाऊ नका.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply