बॉलिवूडला हादरा देणारी बातमी,कंगना राणौत अजय देवगनच्या प्रेमात

मनोरंजन

अभिनेत्री कंगना राणौत तिच्या बोल्ड आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक कारणांमुळे जास्त चर्चेत असते तसंच ती नेहमी वक्तव्यांमुळे वादातही राहते.

   

आता कंगनानं असं काही वक्तव्य केलंय की, बॉलिवूडमध्ये नक्कीच खळबळ उडेल

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि कंगना रणौत खूप जवळ आले होते. त्यावेळी अजय आणि कंगना यांच्यातील रोमान्स जोरात सुरू होता.

हे प्रकरण इतकं वाढलं होतं की, अजय देवगणने कंगनाला ‘रास्कल’ आणि ‘तेज’ सारखे चित्रपट मिळवून देण्यासाठी मदत केली होती. ‘तेज’ हा चित्रपट सर्वप्रथम विद्या बालनला ऑफर करण्यात आला होता, जो नंतर अजयच्या सांगण्यावरून कंगनाला देण्यात आला होता, असे म्हटले जाते.

हे वाचा:   ‘कुठे तो सिद्धार्थ शुक्ला आणि कुठे हा….’; अर्पिता खानच्या ईदच्या पार्टीत एमसी स्टॅन झाला ट्रोल....

अजय आणि कंगना यांच्या नात्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा कंगना अजयबद्दल आवश्यकतेपेक्षा जास्त पझेसिव्ह आणि इमोशनल होत होती. तेव्हापासून अजय देवगणने अभिनेत्रीसोबत अंतर निर्माण करण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे सांगितलं जातं.

एका मुलाखतीदरम्यान अजयवर निशाणा साधताना कंगनाने एका विवाहित पुरुषासोबत राहून मोठी चूक केल्याचंही म्हटलं होतं. या दोघांच्या अफेअरबद्दल ऐकून अजयची पत्नी काजोलनेही अजयचे कान उपटले होते.

Leave a Reply