या अभिनेत्रीला ओळखलंत का.? एकेकाळी टॉपची अभिनेत्री होती, आता करतेय असे काम….

मनोरंजन

या लेखात आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या एका अनामिक चेहऱ्याबद्दल बोलणार आहोत. उदिता गोस्वामी असे त्या अनामिक चेहऱ्याचे नाव आहे. उदिता गोस्वामी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री होती. आज ती अनामिक जीवन जगत आहे. उदिता गोस्वामीने काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला अलविदा केला आहे. आता मात्र ती नव्या कामातून ओळख निर्माण करत आहे. उदिताने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. उदिताचा जन्म 9 फेब्रुवारी 1984 रोजी उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे झाला.

   

38 वर्षांच्या उदिताच्या फिल्मी करिअरची सुरुवात अभिनेता जॉन अब्राहमच्या चित्रपटापासून झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचा पहिला चित्रपट ‘पाप’ होता. हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता. जॉन आणि उदिता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री-दिग्दर्शिका पूजा भट्ट यांनी केले होते. उदिताने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा ती १९ वर्षांची होती. ती आता 38 वर्षांची आहे. 19 वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. एकेकाळी तिची खूप चर्चा झाली होती, पण कालांतराने ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली आणि नंतर गायबही झाली.

हे वाचा:   रोहित शर्मा आणि मुलगी समायरा यांचे कधीही न पाहिलेले फोटो....

उदिता तिच्या पहिल्याच चित्रपटापासून लोकांच्या प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने जॉनसोबत इंटिमेट सीनही दिले होते. या चित्रपटानंतर उदिताला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. ‘पाप’ नंतर ती ‘अक्सर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मी आणि डिनो मोरिया यांनी काम केले होते.

उदिता बऱ्याच दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे, जरी ती सोशल मीडियावर तिचे चाहते आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांशी जोडलेली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आतापर्यंत 129 पोस्ट केल्या आहेत. ती अनेकदा तिचे फोटो पोस्ट करत असते. तेव्हापासून आतापर्यंत उदिताच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे.

उदिताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ती विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे. 2013 मध्ये तिने दिग्दर्शक मोहित सुरीसोबत लग्न केले. दोघांना देवी सुरी आणि कर्मा सुरी ही दोन मुले आहेत. आता प्रश्न पडतो की अभिनय सोडून उदिता आता काय करत आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की उदिता आता एक प्रोफेशनल डीजे आहे.

Leave a Reply