तो माझ्या ओळखीच्या सगळ्या मित्रांसोबतही झोपला… पतीबद्दल अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

मनोरंजन

कंगना राणौतच्या लॉकअप शोमध्ये स्पर्धक दररोज धक्कादायक खुलासे करत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडमध्ये मंदाना करीमीने तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितलं. शोमध्ये वाईल्ड कार्डने एंट्री घेणार्‍या आजमा फल्लाहशी बोलताना मंदाना करीमीने तिच्या एक्स पतीबद्दल बरेच खुलासे केले.

   

कंगना राणौतच्या शोमध्ये मंदाना करीमीला आजमा फलाहसोबत वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री मिळाली होती. आजासोबत बोलताना मंदानाने तिच्या एक्स पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मंदाना करीमीने खुलासा केला आहे की, तिचा एक्स पती तिच्या ओळखीच्या सगळ्या लोकांच्या प्रेमात पडला आहे.

मंदानाने केले सिक्रेट ओपन
लॉकअपमध्ये येण्यानंतर मंदाना करीमी नेहमी चर्चेत असते. आजमा फलाहासोबत बोलताना तिन्हे सांगितलं की, 27 वर्षी तिचं लग्न झालं होतं. आम्ही अडीच वर्ष एकमेकांना डेट केलं. यानंतर त्यांचा साखरपुडा झाला. आणि मग लग्न. आम्ही दोघं बराच वेळ एकमेकांपासून लांब राहत होतो. घटस्फोट तर आत्ता 2021 मध्ये झाला आहे.

हे वाचा:   नवाजुद्दीनसोबत इंटिमेट सीन केल्यानंतर खूप रडली ही अभिनेत्री, म्हणाली त्याला पकडून किस....

आम्ही वेगळे झालो होतो. आणि या चार वर्षांत तो माझ्या ओळखीच्या सगळ्या लोकांसोबत झोपला ज्यांना मी ओळखते. मंदनाचे हे बोलणं ऐकून आजमाने लगेच विचारलं यांच्यात मित्रदेखील होते का? त्याचबरोबर तिला प्रश्न पडतो की, तिचा नवरा घटस्फोटाबाबत आधी का बोलला नाही? यावर मंदाना करीमी एवढंच म्हणते की हा त्याच्या गुपिताचा एक भाग आहे. आणि म्हणूनच कोणालाच याबद्दल काही माहिती नाही.

लग्नानंतर बदललं मंदानाचं आयुष्य
आजमासोबत बोलताना मंदानाने तिच्या लग्नाआधीच्या परिस्थितीबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, ‘लग्नाआधी माझ्या नवऱ्याची आई मला फुलं आणि डोनट्स पाठवायची. आम्ही एकत्र शॉपिंगला जायचो, पार्टी करायचो. ती प्रत्येकवेळी प्रयत्न करायची की मी कुठेही एकटी जाऊ नये.

जरी मी एकटी गेले तरी ती सगळ्यांना फोन करायची की, मी खरंच तिथे आहे की नाही. मंदाना करीमी पुढे म्हणाली, ‘लग्नानंतर अचानक सगळंकाही बदललं. फक्त सलवार कमीज घाला. मंदिरासमोर बसा. ती मला माझ्या मित्रांशी बोलूही देत ​​नव्हती. मग मला समजलं की कुटुंबातील सदस्य कसेही असले तरीही… जर तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही कुठेच राहू शकत नाही.’

Leave a Reply