माधुरी दीक्षित यांचे 5 photos जे पाहून उभे राहिले विवाद, असे काय आहे या फोटोस मध्ये !

मनोरंजन

बॉलीवूड मधील सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा कोणताही परिचय देण्याची आवश्यकता नाही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. त्यांच्या सुंदरतेचे कित्येक युवक दिवाने आहेत. माधुरी दीक्षित यांचे हल्ली 54 वर्षे वय आहे तरीदेखील त्या एखाद्या यंग अभिनेत्री प्रमाणे सुंदर दिसतात.

   

फिट राहण्याकरिता ते आपल्या दिनचर्येत व्यायाम आणि डाएट चा समावेश करतात. त्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि नृत्य कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

माधुरी दीक्षित हल्ली बॉलीवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत आहेत मात्र त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. सुरुवातीच्या काळात एकापाठोपाठ एक असे 10 चित्रपट अयशस्वी ठरले होते. त्यांच्या समोर बरीच आव्हाने येत गेले आणि त्यांना सामोरे जाऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केले. करियरच्या सुरुवातीला माधुरी दीक्षित यांना विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करावे लागली त्यामधून एक चित्रपट म्हणजे ‘दयवान’ यामध्ये त्यांना एक किसिंग सीन करावा लागला होता.

हे वाचा:   वयाच्या साठीत ही सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

एवढेच नव्हे तेजाब यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांना बलात्कार पीडित महिलेची भूमिका निभवावी लागली होती मात्र या चित्रपटाने माधुरी दीक्षित यांना घराघरापर्यंत पोचवले आणि वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर माधुरी दीक्षित यांच्या करिअर ने वेगळे वळण घेतले आहे आणि त्यांना विविध चित्रपटांच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली. इतर सिने सिताऱ्या प्रमाणे माधुरी दीक्षित यांच्या जीवनात देखील काही विवादित घटना घडल्या आहेत.

साल 1989 यावर्षी आलेला चित्रपट ‘वर्दी’ यामध्ये माधुरी दीक्षित यांना बोल्ड सीन्स द्यावे लागले होते माधुरी दीक्षित यांच्यासमोर जॅकी श्रॉफ हे होते आणि या चित्रपटात ही काही असे दृश्य होते ज्यामुळे या चित्रपटाची खूप चर्चा होऊ लागली होती आणि या चित्रपटातील काही सीन्स दयावान चित्रपटा सोबत मिळतेजुळते होते. या चित्रपटानंतर जॅकी श्रॉफ माधुरी दीक्षित यांच्यावर अधिक आकर्षित झाले होते. त्यावेळी जॉकी श्रॉफ यांनी मीडियासमोर माधुरी सोबत रोमँटिक सीन्स करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

हे वाचा:   शाहिद कपूर नाही तर या अभिनेत्यावर झाले होते करीनाला प्रेम; या कारणामुळे नातं गेलं नाही पुढे.!

खलनायक या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना माधुरी दीक्षित बॉलीवूड मध्ये वेगळ्याच उंचीवर पोहोचल्या होत्या. त्यांच्यासोबत काम करण्याकरिता बरेच प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर इच्छुक होते. यावेळी माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांचे प्रेमसंबंध असल्याच्या वार्ता देखील सुरू होत्या.

मीडिया रिपोर्ट अनुसार विशेष गोष्ट म्हणजे खलनायक या चित्रपटात दरम्यान चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी माधुरी समोर एक वेगळीच अट ठेवली होती आणि करारही केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी माधुरी दीक्षित अविवाहित होत्या व त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गर्भवती होऊ शकत नाहीत अशी अट ठेवण्यात आली होती.

जरी माधुरी दीक्षित यांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला व काही अश्लील आणि विवादित चित्रपट करावे लागले मात्र आज त्या बॉलीवुड इंडस्ट्री मधून नामांकित आणि अनुभवी अभिनेत्री झाल्या आहेत. हल्ली त्यांना टीव्हीवरील डान्स च्या कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून पाहिले जाते. लवकरच माधुरी एका फॅमिली ड्रामा सिरीस च्या माध्यमातून OTT जगतात येणार आहेत.

Leave a Reply