वयाच्या साठीत ही सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

मनोरंजन

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. करीना अनेकदा सैफ अली खानचे कौतुक करताना दिसते.

   

त्यासोबतची ती तिच्या दोन मुलांसह सारा आणि इब्राहिमचीही विशेष काळजी घेताना दिसते. वयाच्या ६० व्या वर्षी बाबा होण्याचा विचार करणाऱ्या सैफला करीनाने एक सक्त ताकीद दिली आहे.

करीना आणि सैफ हा २०१२ सालामध्ये लग्नबंधनात अडकले होते. २०१६ साली करीनाने तैमूरला जन्म दिला होता. तर गेल्यावर्षी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्यांनी त्याचे नाव ‘जहांगीर’ ठेवले आहे. सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. सारा अली खान आणि जहांगीर यांच्यात २५ वर्षांचा फरक आहे.

हे वाचा:   'मी 5 नाही तर 500 मुलींसोबत केलं...', सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकच्या घा"णेर"ड्या कृत्यांचा व्हिडिओ व्हायरल..

नुकतंच एका मुलाखतीत करीनाला चारही मुलांसह सैफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. Vogue या मासिकाशी बोलताना करीना म्हणाली, “सैफला प्रत्येक दशकात एक मूल झाले आहे. सैफला वयाच्या २० व्या, ३० व्या, ४० आणि ५० व्या वर्षीही मुले झाली आहेत.

मात्र आता ६० व्या वर्षी ते होऊ नये, असे मी त्याला सांगितले आहे.”“पण मला असे वाटतं की सैफसारखा आधुनिक विचारांचा माणूसच वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा बाप होऊ शकतो.

तो त्याच्या चारही मुलांना पूर्ण वेळ देतो. सैफ सध्या जेहसोबत जास्त वेळ असतो. तो एक वडील म्हणून त्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

आम्ही आमच्यात एक करार केला आहे. जेव्हा तो एखाद्या चित्रपटाचे शूटींग करत असेल तेव्हा मी घरी राहणार आहे आणि त्या उलट जेव्हा मी शूटींग करत असेन तेव्हा तो घरी मुलांसोबत थांबेल”, असे करीनाने यादरम्यान सांगितले.

Leave a Reply