TMKOC: तारक मेहता मालिकेतील या प्रसिद्ध कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: तारक मेहता या मालिकेतून अनेक कलाकार शो सोडून गेले असताना कलाकार आणि निर्माते असीद मोदी यांच्यामध्ये एक वेगळीच झुंज पाहायला मिळत होती.

   

तारक मेहता ही मालिका(Tarak Mehta Show Actors) पाहणारे सगळेच चाहते आपले आवडते कलाकार सोडून गेल्यानं नक्कीच निराश झाले होते. त्यामुळे सध्या आता चाहत्यांना फक्त हीच आशा आहे की जुने कलाकार हे परत येतील.

मध्यंतरी निर्माते असीद मोदी (Taark Mehta Producer Asid Modi) यांनीही कलाकार सोडून गेल्यावर कोणीही कलाकार मालिका सोडून गेल्यावर दु:ख होते असे म्हणाले होते होते. त्यात आता तारक मेहता ही भुमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोंढा यांनी इन्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे.

हे वाचा:   डॉ.नेनेंनी शेअर केला माधुरी दीक्षितचा मेकअपशिवायचा फोटो, लोकांनी उडवली खिल्ली, जाणून घ्या कारण

शैलेश लोंढा हे अभिनयासोबत चांगल्या कविताही करतात. त्यांच्या कविता ते सोशल मीडियावर(Actor Shaliesh Lodha Instagram Post) पोस्टही करतात. नुकतीच त्यांनी अशीच एक कविता पोस्ट केली आहे.

ज्याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे कोणाला तरी उद्देशून काही ओळी लिहिल्या आहेत. त्याखाली लोकांनी ही कविता निर्माते असीद मोदी यांच्यासाठी लिहिली गेली असल्याचे तर्कवितर्क लावले आहेत.

या कवितेतून शैलेश यांनी कोणावर तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदीत कविता लिहिली आहे ज्यात ते म्हणतात, ‘सरळ व्यक्तीसोबत केलेला छळ तुम्हाला बर्बादीच्या दरवाज्यापाशी घेऊन जातो. तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे बुद्धीबळ खेळणारे असलात तरी त्याचा काही उपयोग नसतो.’

हे वाचा:   रस्त्याच्या मधोमध फोटो काढत होता फॅन, रणबीर कपूरने केले असे कृत्य.! व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले.!

अशा भाषेत त्यांनी कोणावरती टीका केल्याचा अंदाज येतो आहे परंतु चाहत्यांसाठी मात्र ही कोड्यात टाकणारी पोस्ट आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज नाही तर उद्या देव सगळंच पाहतो… ‘

Leave a Reply