लग्न एकाशी अन् हनिमून दुसऱ्यासोबत; पळून गेलेल्या बायकोची नवऱ्याने झोपच उडवली, प्रियकराच्या पत्नीसोबत केलं असं काही…

Uncategorized

लग्नसराईचा सीजन सुरु असून नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ आणि लव्हस्टोरीचे किस्से सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही प्रेमीयुगुलांच्या लव्हस्टोरीने प्रेम, सेक्स आणि धोका अशाप्रकारचा वळण घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बिहारच्या खगडिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

   

बायको प्रियकरासोबत पळून गेल्यावर नवऱ्याने एक वर्षांनंतर बायकोच्या प्रियकराला जशाच तसं उत्तर दिल. बायको पळून गेल्यावर नवऱ्याने थेट त्या तरुणाच्या पत्नीशीच लग्न केलं. प्रेमप्रकरण कधी कोणत्या वळणावर जाऊन पोहोचेल, याचा नेम राहिला नाही, असंच या धक्कादायक घटनेतून समोर आलं आहे.

इटीव्ही भारतने दिलेल्या माहितीनुसार, रुबी देवी नावाच्या महिलेनं २००९ मध्ये नीरज नावाच्या तरुणाशी लग्न केलं होतं. या दाम्पत्याला चार मुलं आहेत. पण काही वर्षानंतर पत्नीचं मुकेश नावाच्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं नीरजला माहित झालं. फेब्रुवारी २०२२ मध्ये रुबी आणि मुकेशने लग्न केलं. या धक्कादायक घटनेबद्दल नीरजला समजलं. त्यानंतर नीरजने पोलीस स्टेशनमध्ये मुकेशविरोधात पत्नीचं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.

हे वाचा:   महागड्या गाड्या अन् लॅव्हिश लाईफस्टाईल, मुंकेश अंबानींच्या सूनेकडे आहे 'इतकी' संपत्ती

मुकेशचंही लग्न झालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे मुकेशच्या पत्नीचं नावंही रुबी आहे. त्यांना दोन मुलं आहेत. पण नीरजने बदला घेण्यासाठी मुकेशच्या बायकोशी फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केलं. व्हायरल झालेल्या या अजब लव्हस्टोरीने इंटरनेटवर अनेक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वांना चक्रावून टाकणाऱ्या या प्रेमप्रकरणामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “लग्न झालेली माणसं एकमेकांसोबत पळून जात आहेत आणि मी अजूनही अविवाहीत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “प्रत्येक अॅक्शनवर त्याच पद्धतीने रिअॅक्शन होते, हे आज सिद्ध झालं.”

 

 

Leave a Reply