प्रियकरासोबत बेडवर तसल्या अवस्थेत सापडली पत्नी, पतीने विरोध न करता केली अशी मागणी, ऐकून बसेल धक्का….

जरा हटके

अनैतिक संबंधांच्या झालेल्या भयानक शेवटाच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण ही कहाणी जरा वेगळीच आहे. अशा नात्यांचा शेवट हा मारहाण, हत्या असा होतो. मात्र या प्रकरणाची अखेर ज्या प्रकारे झाली ते जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

   

ही घटना छत्तीसगडमधील आहे. येथे एका तरुणाने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत बेडवर आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. मात्र त्या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतरही तो रागावला नाही. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला असं काही सांगितलं की ते दोघे अवाक झाले. पत्नीला तर त्याचं बोलणं ऐकून धक्काच बसला. शेवटी एखादा पती असा विचार कसा काय करू शकतो, असा प्रश्न तिला पडला.

या महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या प्रियकराला सांगितले की, तुमच्या दोघांमधील संबंधांना माझा कुठलाही आक्षेप नाही आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, मात्र त्यासाठी तुम्हाला माझी एक मागणी पूर्ण करावी लागेल.

हे वाचा:   एका बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये शारीरिक संबंध ठेवताना पकडलं गेलं प्रेमी युगुल आणि मग....

या व्यक्तीने अनैतिक संबंधांची ही गोष्ट गुपित ठेवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. आता प्रकरण निस्तरण्यासाठी पत्नीचा प्रियकर तडजोड करण्यास तयार झाला. तसेच तिथून निघून गेला. त्यानंतर सदर तरुण त्याच्या पत्नीला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने पत्नीच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला. जेव्हा ही बाब महिलेच्या प्रियकराला समजली तेव्हा त्याने धमकी देऊन दहा लाख रुपये खंडणी म्हणून वसूल केल्याची तक्रार दिली. आता पोलिसांनी दोन्हीकडून तक्रार नोंदवून घेतली आहे. तसेच या अजब प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली आहे.

आपली पत्नी आणि तिचा त्याच गावातील प्रियकर यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याची कुणकुण या तरुणाला होती. त्याची पत्नी काहीतरी निमित्त काढून प्रियकराला भेटायला जाते, हेही त्याला माहिती होते. मात्र तो त्यांना काहीही बोलत नव्हता. दोघे कधी रंगेहात सापडतात, याचीच वाट तो पाहत होता.

हे वाचा:   मुलीच्या प्रियकरासोबत आईने बनवले संबंध, जेव्हा मुलीला समजले तेव्हा....

अखेर एकेदिवशी त्याला ती संधी मिळाली. त्याची पत्नी काहीतरी निमित्त काढून घराबाहेर पडली. तिच्या पाठी तिचा पतीही बाहेर पडला. पत्नी प्रियकराला भेटण्यासाठी थेट एका खोलीत गेली. तिथे त्यांचे चाळे सुरू असताना पतीने त्यांना रंगेहात पकडले. पतीला समोर पाहताच ते अवाक झाले. तसेच जेव्हा पतीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, तेव्हा त्यांचा विश्वास बसणे कठीण झाले.

Leave a Reply