मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काळा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होत असतात. जर आपण कोरा चहा पीत असाल तर आपण अगदी योग्य प्रकारचा चहा पीत आहात. कोरा चहा पिण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात. जे लोकं काळा चहा पीत नाहीयत दूध टाकलेला चहा पितात ते लोकं हि माहिती वाचल्या नंतर कोरा चहा पिण्यास सुरवात करतील.
मित्रांनो जे नियमितपणे काळा चहा पितात त्यांना सर्वात मोठा फायदा होतो तो म्हणजे त्यांचा मेंदू तल्लख राहतो. त्यामुळे कोरा चहा पिल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होण्यास मदत होते आणि मेंदूच्या पेशी स्वस्थ्य राहतात. त्यामुळे आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होऊ शकते.
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम असतात, जर तुमचा मेंदू थकून जाईल अशा प्रकारची काम जर तुम्ही करत आहात तर अशा माणसांनी आवर्जून काळा चहा पियायला हवा. याचा दुसरा फायदा असा कि ज्यांना खूप तणाव आणि स्ट्रेस येतो, लहानसहान गोष्टींवरून टेन्शन घेतात अशा लोकांनी देखील काळया चहाचं नियमित सेवन करा. तणाव आणि स्ट्रेस कमी करण्याचं काम हा काळा चहा करत असतो.
मित्रांनो आजकाल कॅन्सर च प्रमाण फार वाढलाय अगदी सेलिब्रेटीना सुद्धा कॅन्सरने पछाडलं आहे. आणि मग या कॅन्सरपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर आपण आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत. त्याच पैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा. आपण जर काळा चहाचं नियमित सेवन केलं तर आपला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.
म्हणजेच तोंडाचा कर्करोग, तसेच स्त्रियांमध्ये होणारा ब्रे-स्ट कँसर, गर्भा-शयाचा कँसर, आणि फुफुसांना होणारा कॅन्सर इद्यादी अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो जर तुम्ही नियमितपणे कोरा चहा घेतलात तर. मग मित्रांनो इतका सारा फायदा होत असेल तर आपण देखील आजपासून काळा चहा घ्यायला सुरवात करा.
जर तुम्हाला स्वस्थ हृदय हवं असेल, जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर आपण देखील कोरा चहा आजपासून घ्यायला सुरवात करा.या कोऱ्या चहामुळेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं, आणि परिणामी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही कमी होत.
जर आपणास ग्यास आणि ऍसिडिटी चे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काळा चहा नियमितपणे घेत चला. यामुळे ग्यास आणि ऍसिडिटीपासून आपला बचाव होईल. पोटदुखीचा त्रास जर आपल्याला होत असेल तर काळा चहा हा जरा जास्त उकळा आणि हा चहा तुम्ही पिया. तुमची पोटदुखी १० ते १५ मिनिटांमध्ये थांबून जाईल. हगवण, अतिसार हा जर प्रॉब्लेम असेल तर यावर तुम्ही काळा चहा घेतलात तर तो उपयोगी ठरू शकतो.
मित्रांनो स्किनचे अनेक प्रोब्लेम असतात, त्यापैकी सुरकुत्या जर तुमच्या चेहऱ्यावर पडल्या असतील तर या सुरकुत्यांवरती चांगला उपचार आहे. तुम्ही नियमितपणे काळा चहाचं सेवन करा त्यामुळे सुरकुत्यांचं प्रमाण कमी होईल. त्यावर योगासने आणि प्राणायाम ची जोड सुद्धा तुम्ही देऊ शकता. मित्रांनो कोऱ्या चहामध्ये अँटिऑक्सिन च प्रमाण फार मोठं आहे. आणि यामुळेच त्वचेशी संबंधित जे कँसर आहेत ते बचाव करण्याचं काम हा काळा चहा करत असतो.
आणि शेवटचा जो फायदा आहे तो म्हणजे वजन वाढण्यावर, आपलं वजन खूप वाढलेलं आहे, लठ्ठपणा आहे तर आपण हा कोरा चहा घ्या. कोरा चहा घेण्याने आपल्या शरीरातील जी मेटापॉलिसीम प्रोसेस आहे म्हणजेच चयापचय प्रक्रिया. या प्रक्रियेचा वेग वाढतो आणि त्यामुळे आपण जे काही खाऊ त्याचे चांगल्या प्रकारे पचन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉलच प्रमाण हे कमी करत. आणि हे कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने आपोआपच वजन नियंत्रणात राहतं.
तर मित्रांनो अशाप्रकारे याचे अनेक फायदे सांगता येतील. तर मित्रांनो तुम्ही कोरा चहा आजपासून घ्यायला सुरुवात करा. याचे फायदे तुम्हाला सुद्धा होतील, तुम्ही सुद्धा निरोगी जीवनशैली जगू शकता. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका.