नागांना आपल्या भारतात पूर्वीपासून विशेष महत्व दिले जाते. श्रावणतील सण हे नागपंचमीच्या सणापासूनच सुरु होतात. नाग हा शेतकरी बांधवांचा मित्र असतो कारण तो शेतात उपद्रव करणारे शेताची नासाडी करणारे प्राणी म्हणजे उंदीर तथा घुशींना खावून टाकतो आणि शेतीचे रक्षण करतो म्हणून या नागराजाला विनम्र अभिवादन करण्यासाठी बायको श्रावणाच्या दिवसात सगळी शेतीची कामे आटपली की नाग देवतेची पूजा केली जाते.
परंतू तुम्हाला हे माहित आहे का, जर आपण नागराजाची योग्य पद्धतिने आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा केली तर नाग देवता आपल्यावर खुष होवून आपल्या झोळीत जगभरातील आनंद भेट म्हणून देते. चला तर पाहूया नक्की कशा प्रकारे ही पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी महिला नव-नवीन कपडे परिधान करतात. ज्या बायकांची लग्नानंतर पहिलीच नाग पंचमी असते त्या ही पूजा करण्यासाठी आपल्या माहेरी जातात. मित्रांनो ही पूजा मनोभावे केल्याने आपल्या कुटुंबाला सर्पदंशाचा कोणता ही धोका होत नाही तथा घरात सुख समाधान नांदू लागते.
पूर्वी पासूनच नागाला दूध अर्पण करण्याची प्रथा चालत आली आहे या मागे एक कथा आहे जेव्हा राजा जनमजन यांनी नागयज्ञ केला होता त्यावेळी अनेक नाग त्या आहुतीत जळाले होते त्यांच्या शरीराची लाही-लाही झाली होती आणि अश्या वेळी त्यांचे रक्षण करण्यासाठी ऋषि अस्तिक यांनी त्यांच्या शरीरावर दूध टाकले आणि त्यांचे रक्षण केले तेव्हा पासूनच सापांना दूध दिले जाते.
मित्रांनो सोबतच लाहया, धूप, फळे, फूले सुद्धा अर्पण करा ही सगळी सामग्री एकत्रित करुन मनापासून तुम्ही नाग देवतेची पूजा केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होतील. महादेवांच्या गळ्यातही नाग विरजित आहे तसेच भगवान श्री हरी विष्णू सुद्धा नागावर विराजमान असतात तसेच समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नावाच्या एका नागानेच देव आणि दैत्य यांना मदत केली होती.
मित्रांनो या दिवशी उपवास ठेवून नागाची योग्यरित्या पूजा केल्यास आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. असे केल्यास तुमच्या घरात धन-संपत्तीची कधी कमी नाही भासणार तुमचे घर नेहमी सुखात नांदू लागेल. भविष्य पुरणाच्या अनुसार आपण ही पूजा केल्यास नाग देवतेच्या कृपेने आपली सगळी पापे धूतली जातात आणि आपला जन्म सार्थकी लागतो मोक्ष प्राप्ती होते.
मित्रांनो हे व्रत करताना आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे जर सर्पराज प्रसन्न झाले तर तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणूनच म्हणून समजा. नाग देवतेच्या पूजेसाठी जर वारुळाकडे जाणे शक्य नसेल तर आपण घरची नाग देवाच्या फोटो अथवा मूर्तीची पूजा करु शकतो. ही पूजा करुन तुम्ही सर्प-दोष घालवू शकता. अनेक महिला नाग देवतेला आपला भावू मानतात आणि आपल्या परिवाराची रक्षा करण्याची प्रार्थना करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.