फक्त ‘ही’ 1 वस्तू खाऊ नका, वजन झटपट कमी करण्यासाठी घरगुती उपाय..फक्त हा पदार्थ खाणे टाळा; वजन सात दिवसात उतरू लागेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आमच्या या फेसबुक पेज वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुमचे वजन कमी करायचे असेल आणि भविष्यात वाढू नये असे वाटत असेल. तर आजच हा एक पदार्थ खाणे कमी करा किंवा यापुढे खाऊच नका. ज्या व्यक्तीचे वजन वाढते. त्यांना हृदय रोग, किडनीचे रोग , गुडघेदुखी, पाठदुखी, हाय बीपी ,शुगर अशा अनेक रोगांना सामोरे जावे लागते.

   

किंवा हे रोग होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला जर हे रोग होऊ नये असे वाटत असेल तर आपण आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं, हे वजन कंट्रोल मध्ये राहण्यासाठी किंवा वाढू नये यासाठी आहारात काही पदार्थ टाळले गेले पाहिजे. असा एक पदार्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे, कि जर हा पदार्थ तुम्ही खायचा कमी केला तर तुमचं वजन झटपट कमी होईल आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वजन वाढण्यामागे महत्त्वाचा जो कारणीभूत घटक आहे, ते म्हणजे जास्तीचा आहार.

आपल्याला जर एखादा पदार्थ ची चव आवडली तर, आपण आपल्या भुकेपेक्षा जास्त हा प्रदार्थ खातो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण जर बैठे काम करत असाल तर आपल्याला साधारण १५०० ते १६०० कॅलरीज ऊर्जा लागते. आणि जर यापेक्षा जास्त अन्न ग्रहण केले किंवा जास्त जेवण केलं तर आपलं वजन नक्कीच वाढणार.

आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती वजन कमी करायचं असतं मात्र व्यायाम करायला नको, असे त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तींनी काही नियम पाळले पाहिजेत. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी हा नियम नक्कीच पाळावा. त्यातील प्रथम नियम पुढील प्रमाणे.

हे वाचा:   याचे फक्त 4 दाणे रोज खा.. प्रचंड जोश आणी वी-र्य वाढेल, मरेपर्यंत कॅल्शियम कमी होणार नाही.. बघा फायदे..

दिवसभरामध्ये फक्त दोनदा जेवण करायचं. दोनदा जेवण सोडून कॉफी चहा नाष्टा इतर कुठलाही पदार्थ ग्रहण करायचा नाही सेवन करायचा नाही किंवा दिवसभरामध्ये खायचा नाही. जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी प्या किंवा भूक लागली तर पाणी प्यावे म्हणजे फक्त पाणीच पिऊ शकता.

आणि दुसरा नियम म्हणजे प्रत्येक घास 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे त्यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीरात चरबी वाढत नाही. मित्रांनो आज आपण जो पदार्थ सांगणार आहोत.तो आपल्याला खायचा नाही, असा पदार्थ म्हणजे साखर. नैसर्गिकरित्या अन्नातून मिळणारी जी साखर असते तिचे जे प्रमाण असतं ते आपल्याला बाहेरून मिळणाऱ्या चहा, कॉफी किंवा आपण जे स्वीट डिश म्हणजे गोड पदार्थ खातो यापेक्षा निश्चितच कमी असते.

पण चहा, कॉफी, स्वीट डिश मधून मिळणारी साखर ही जास्तीची साखर आहे, हि शरीरामध्ये फक्त चरबी-चरबीच तयार करते. आपण एक वेळेस जो चहा घेतो त्यावेळी आपण जी साखर वापरतो. ती साधारणतः शरीरामध्ये २०० कॅलरीज ऊर्जा निर्माण करते.आणि आपण जर दिवसभरामध्ये दोन, तीन ,चार चहा घेत असाल तर अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरात किती कॅलरी ऊर्जा किती कॅलरीज साठतात. याचा विचार तुम्ही करू शकता.

हे वाचा:   मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर..ही १ चूक अजिबात करू नका !

म्हणून आयुर्वेदात हि जी साखर आहे त्याला पांढर विष असा म्हटलेलं आहे. आणि साखर कुठे हि जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये असा उल्लेख केलेला आहे. आणि साखरे ऐवजी खडीसाखर वापरा असेही म्हटलेले आहे पण तिथेही खूप कमी प्रमाणामध्ये वापरायला सांगितलेला आहे.

म्हणून आज पासून आपण जर साखर खाणे बंद केले किंवा हळूहळू साखर खाणे कमी केले तर तुम्हाला पंधरा दिवसात जाणवेल कि तुमच्या श-रीरातील जी चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुम्ही जर साखरेऐवजी गूळ वापरला तर,

मित्रांनो गुळ असो किंवा साखर असो दोन्हीही आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्माण करतात. आणि हि ऊर्जा साधारणतः दोनशे ते तीनशे कॅलरीज एक ते दोन चमचा साखरेचे किंवा गुळाचे असते. दोन्हीही प्रदार्थ एकसमान प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात, म्हणून आपल्याला दोन्हीही प्रदार्थ खायचे टाळाचे आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशल गोड पदार्थ देखील टाळायचे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात जाणारी साखर कमी होईल आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply