घरात मुलगी का असावी? जरूर जाणून घ्या घरात मुली असण्याचे फायदे..

अध्यात्म

आज आपला समाज इतका पुढारलेला असूनही आपण बहुतेक ठिकाणी बघतो की मुलगी ज-न्माला आली की नाके मुरडली जातात आणि मुलगा झाला की पेढे वाटले जातात. सर्वांना अपेक्षा असते की आपल्याला एक तरी मुलगा जरूर असावा मुलगी नसेल तर चालले पण मुलगा हवा. वंशाला दिवा हवा असा सर्वांचाच आग्रह असतो.

   

पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा ठेवली जाते व ग-र्भधारण केला जातो परंतु जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही. आजही मुलींना ओझे समजले जाते ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. परंतु जसे आपल्या मृत्यूनंतर आपल्याला मोह , माया, ममता, राग, द्वेष या सर्वांपासून सोडवण्यासाठी मुलगा असावा लागतो.

त्याप्रमाणेच आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादानात आपल्या घरात आणतो त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणालातरी कन्यादान करावे लागते आणि कन्यादान करण्यासाठी मुलगी असावीच लागते आपण जर इतरांकडून कन्यादान घेतलेले असेल आणि आपण त्या दानाची परतफेड केली नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊ शकत नाही.

हे वाचा:   R अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव..जाणून घ्या यांचे वैवाहिक जीवन, गुण-अवगुण, आवडी-निवडी..

पत्नीच्या रुपात आपण कन्यादान घेतो तेव्हा कन्याच्या रुपात ते दान आपल्याला परत करावेच लागते त्यावेळीच आपण या संसार बंधनातून मुक्त होतो. मुलगा फक्त आपल्याच कुळाचा उद्धार करतो परंतु मुलगी ही सासरच्या व माहेरच्या या दोन्ही कुळाचा उद्धार करते. ज्या व्यक्तीवर भगवंताची कृपा होते त्यांच्याच घरात मुलीचा ज न्म होतो असे म्हणतात की मुलगी झाली लक्ष्मी आली मुलगी ही लक्ष्मीच्या पावलाने घरात येते.

मुलगी घरात आली की आनंद व समृद्धी येते घरातील वातावरण लगेच बदलते. मुली इतकी माया इतर कोणालाही नसते मुली पासून जे प्रेम आई-वडिलांना मिळते ते प्रेम मुलापासून मिळूच शकत नाही. मुलगी म्हणजे वात्सल्याचा झरा असते. असे म्हणतात की आपल्या पिढ्यामध्ये जर एखादा संत महात्मा ज-न्माला आला तेव्हा त्याच्या मागील व पुढील 21 पिढ्याचा उद्धार होतो.

आजकाल तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुले आई- वडिलांना संभाळायला नकार देतात त्यावेळी मुलीच आई वडिलांचा संभाळ करतात मुलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगल्या पद्धतीने ते आई- वडिलांना सांभाळतात. म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाहीत तर मुली अगदी ताट मानेने उभ्या राहतात.

हे वाचा:   हे झाड घराच्या जवळ लावल्याने भिकारी सुद्धा श्रीमंत बनतो..घरावर करणी, नजरबाधा चा कोणताही परिणाम होत नाही..सदैव घराची प्रगती होते..

मुलीचे आपल्या आई पेक्षा वडीलांवर थोडेसे अधिक प्रेम असते त्या शिवाय वडिलांना प्रेमाने लाडाने सर्व काही पटवून देण्याचे काम सुद्धा मुलीला खूप छान प्रकारे जमते. ती मूल आई-वडिलांना रागावते वडिलांना बोलते ही परंतु तेवढेच प्रेमही करते जे तिच्या आईला ही शक्य नसते. वडील ही मुलीच्या शब्दाबाहेर नसतात मुलीने सांगितले आणि वडिलांनी ऐकल नाही हे कधीही शक्य नसते अशी गोंडस लाडकी लेक सर्वांच्या घरी जरूर असावी.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply