आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे फार महत्व आहे. घरात काय ठेवावे काय ठेऊ नये व घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी या विषयी संपूर्ण माहिती आपल्याला वास्तु शास्त्रामुळे मिळते. आज आपण हत्ती विषयी माहिती घेणार आहोत हत्तीला हिंदू संस्कृतीत खूप शक्तिशाली व पवित्र प्राणी मानले जाते. हत्ती खूप जास्त वर्ष जगतो म्हणून हत्तीला दीर्घ आयुष्याचे प्रतिक ही मानले जाते.
वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने आपल्याला खूप फायदे होतात. आपले घर असो दुकान असो ऑफिस असो किंवा फॅक्टरी असो प्रत्येक ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवणे खूप लाभदायक मानले जाते. घरात किंवा दुकानात हत्ती ठेवताना हत्तीचे सोंड वरी केलाच असावा याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात.
ध’र्म ग्रंथात दिलेले आहे की चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने आपल्या घरावरील वाईट ग्रहांचा नाश होऊन त्याचा चांगला प्रभाव आपल्या जीवनावर पडतो परंतु तो हत्ती भरीव असावा. आपण हत्तीकडे गणपती बाप्पाचे एक स्वरूप म्हणून ही पाहतो. घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूला वरती सोंड केलेले 2 हत्ती लावल्यास घरात प्रेम व आनंदी वातावरणाची निर्मिती होते तसेच आपल्या घरावर कोणाची वाईट नजर दोष ही लागत नाही.
घरात जर सतत वादविवाद व भांडण तंटे होत असतील. तर घरातील वादविवाद व भांडणे मिटवण्यासाठी 3 हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावेत. हे 3 हत्ती अश्या प्रकारे ठेवावेत की सर्वात मोठा हत्ती पूढे आणि सर्वात लहान हत्ती सर्वात मागे असावा अश्या उतरत्या क्रमाने हत्तींचा कळप ठेवावा. बेडरूममध्ये जर पांढऱ्या रंगाची हत्ती ठेवणे खूप शुभ असते.
यामुळे पती पत्नी मधील प्रेम वाढीस लागते. पूर्वीच्या काळी असे मनत असत की कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर खऱ्या हत्तीच्या पोटाखालून निघावे आणि हत्तीच्या पायाखालीची माती उचलून विहिरीत टाकावी या उपायामुळे आपल्यावरील सर्व कर्जाचा त्रास हळूहळू मिटेल. जर तुमच्यावर शत्रूंचा त्रास वाढला असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या माहोतला दान करावे.
यामुळे शत्रूचा त्रास कमी होतो आणि तुम्हाला शत्रूपासून होणार त्रास कमी होतो. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी घरात पैश्याची आवक वाढावी असे वाटत असेल तर चांदीचा एक भरीव हत्ती बनवून आपल्या पैश्याच्या तिजोरीत ठेवावा. हत्ती वरती सोंड केलेलाच असावा या उपायामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होऊन घरात पैश्याची आवक वाढेल यामुळे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये फरक जाणवेल.
वरती सोंड केलेला 1 हत्ती तुमच्या ऑफिसच्या टेबलवर जर ठेवलात तर तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होते तसेच आपल्या निर्णय क्षमतेत ही वाढ होते. जर चांदीचा हत्ती बनवणे आपल्याला शक्य नसेल तर संगम रोडाचा छोटा हत्ती बनवून तो देखील आपण घरात किंवा ऑफिसमध्ये ठेऊ शकतो.
तुमच्या लि व्हिं ग रूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात शांतता आणि सौख्य प्रदान होते त्याबरोबर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळते. घरात किंवा खिश्यात, पर्स, पॉकेटात चांदीचा छोटा हत्ती ठेवावा हा उपाय राहू दोषासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला राहूचा त्रास होत नाही आणि व्यापार व्यवसायत ही फायदा होतो. चांदीचा हत्ती घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवणे वास्तू शास्त्रीय दृष्ट्या शुभ असते. यामुळे घरात समृद्धी येते.