वास्तुशास्त्र: तुमच्या घरातील कॅलेंडर ची दिशा बदला पैसा इतका येईल, नशीब साथ देऊ लागेल..जाणून घ्या योग्य दिशा..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो आपल्या घरातील आणि आयुष्यातील दोन अशा महत्वाच्या गोष्टी ज्यांची दक्षता घेतल्याने तुम्ही खूप श्रीमंत बनू शकता. या अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपली वेळ दर्शवतात जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वेळ ही खूप महत्त्वाची असते कारण ती एकदा गेली की परत येत नाही. सर्व काही मिळवता येते पण वेळ परत मिळवता येत नाही.

   

वेळ दर्शवणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे एक घड्याळ आणि दुसरं म्हणजे घरातील कॅलेंडर होय. हे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावल्याने प्रगती होते, कोणत्या दिशेला लावल्याने नुकसान होते हे आपण आज पाहणार आहोत. आपला दिवस आणि वेळ ज्या गोष्टी ठरवतात त्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत ज्यांच्याकडे विशेष लक्ष देण गरजेचं आहे.

त्यापैकी कॅलेंडर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावू नये हे प्रथम पाहूया. आपल्या घराची दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवर कॅलेंडर कधीही लावू नये. कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते. तसेच यामुळे घरातील लक्ष्मीचे वास्तव्य अस्थिर राहते. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नये.

हे वाचा:   जेव्हा पोळी खाऊ घालायला गाय नसेल तेव्हा काय करावे..करा हा साधा उपाय ! ३३ कोटी देवांचा मिळेल आशीर्वाद..

काहीजण दरवाज्याच्या मागे किंवा पुढे कॅलेंडर लावत असतात. असे चुकूनही करू नका कारण दरवाज्यातून गोष्टी आत येत असतात ज्यांचा परिणाम नकळत पणे कॅलेंडर वरती होत असतो. हे कॅलेंडर कुठं लावू शकता ज्यामुळे तुम्हांला ते लाभदायी ठरेल. तुम्ही ही दिशा तुमच्या गरजेनुसार लाभ घेण्यासाठी ठरवू शकता.

जर तुमच्या घरी पैसे येत नसेल, पैसे स्थिर राहत नसेल तर उत्तर दिशेच्या भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. जर आपल्या घरात येणारा पैसा टिकत नसेल किंवा नाहक खर्च होत असेल तर तुम्ही कॅलेंडर घराच्या पश्चिम भिंतीला लावू शकता. यामुळे घरात सौख्य, स्थिरता लाभेल.

पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कॅलेंडर वापरता, काही ठरवता तर तेंव्हा तुमचा चेहरा दक्षिणेला होणार नाही याची दक्षता नक्की घ्या. जे लोक सामाजिक कार्य करतात त्यांच्या प्रगती साठी पूर्व दिशेच्या भिंतीला कॅलेंडर तुम्ही लावू शकता, तसेच सतत आजारपण, दुखणं असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला कॅलेंडर लावले पाहिजे.

हे वाचा:   ज्या घरात या 5 वस्तू असतात त्यांना श्रीमंत बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही..घरात पैसा खेचून आणण्यासाठी या गोष्टी घरात अवश्य ठेवा..

तसेच प्रगतीसाठी, प्रमोशन साठी तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. कॅलेंडर खरेदी करताना त्यावरती हिं-स्त्र प्राणी चित्र असू नयेत कारण त्यामुळे एक वेगळे वातावरण आपल्या घरावर परिणाम करते. रडणारी, उदास चित्र, चेहरे असणारे कॅलेंडर सुद्धा खरेदी करू नये.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply