तुळजा भवानी मंदिरातील हे रहस्य जाणून तुम्हीही चकित व्हाल; वैज्ञानिक सुद्धा हे रहस्य उलगडवू शकले नाहीत.!

अध्यात्म

भारतात अनेक पुरातन मंदिरे आहेत ज्यांची विविध वैशिष्ठ्ये आहेत.भाविक तिथे मोठ्या आस्थेने येतात, नवस बोलतात. काही जागरुक देवस्थाने अशी आहेत जिथे आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होतात. अश्याच एका देवस्थाना बद्दल जाणून घेऊया. आई भवानीच्या या मंदिरात असा एक दगड आहे. ज्याची महिमा ऐकून तुम्ही हैराण होवून जाल. हा असा चमत्कारीक दगड आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करतो.

   

जेव्हा तुम्ही या दगडावर हात ठेवाल आणि मनात कोणती गोष्ट मागाल ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार. मित्रांनो या रहस्यमय दगडावर अनेक वैद्यानिकांनी अनेक प्रयोग केले परंतू त्या ते या मागच गुपित काही उलगडू शकले नाहीत. आत्ता प्रश्न हा उद्भवातो की हा दगड आला कुठून आणि काय आहे ह्या मागचं गुपित? मित्रांनो चला तर आई तुळजाभवानीच्या मंदीरातील या दगडा बद्दल जाणून घेऊया.

महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एक प्राचीन मंदीर आहे. ज्याच नाव आहे माता तुळजाभवानी मंदिर. तुळजाभवानी आईला छत्रपती शिवाजी महाराजांची कुल देवी मानले जाते.महाराष्ट्रतल्या बांधवांची माते वर अपार भक्ती आहे आणि हे देवस्थान मातेच्या 350 शक्ती पिठांपैकी एक आहे. माता भवानी आई महिशासूर मर्दिनी आहे. या मंदिराच्या कळसावर अत्यंत सुंदर असे नक्षीकाम आहे.

हे वाचा:   शत्रूवर विजय मिळविण्यासाठी कुत्र्याला खायला घाला हि खास वस्तू..शत्रू आपल्यासोमर गुडघे टेकेल..सर्व त्रास दूर होतील..

मंदिरात प्रवेश करतानाच 2 विशाल महाकाय दरवाजे दिसून येतात. पुढे कलोळ तिर्थपिठ आहे. या नंतर गौ-मुख तिर्थपिठ आहे. यातले पाणी गंगाजळ प्रमाणेच पवित्र आहे. इथून पुढे गेल्यास सिद्धीविनायक नामक गणपती मंदिर आहे तथा पुढे मुख्य कक्षात मातेची प्रतिमा आहे. डाव्या बाजूला मातेच्या आराम कक्षात चांदीच पलंग ठेवला आहे. या पलंगाच्या समोरचं शिवलिं’ग स्थापित आहे याला लांबून पहिल्यावर असे वाटते की जाणू माता आणि महादेव एकमेकांकडेच बघत आहेत.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक ‘युध्दाआधी’ मातेच्या या मंदिरात यायचे. मातेने प्रसन्न होवून राजांना धर्मरक्षणासाठी भवानी तलवार भेट म्हणून दिली होती. याच तलवारीच्या मदतीने महाराजांनी कित्येक ‘लढाया’ जिंकल्या आता ही तलवार लंडनमधील पुरातन वस्तूं सहंग्रालयामध्ये आहे.

मित्रांनो तसेच या मंदिरात चांदीने मडवलेला एक स्तंभ आहे असे मानले जाते की जर तुम्हाला कोणती शारिरीक पीडा असेल तर 7 दिवस या स्तंभाला स्पर्श करुन ही पीडा दूर केली जाते. मित्रांनो या मंदिरात असे एक रहस्य आहे जे उलगडण्यासाठी वैद्यानिकांनी आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. मित्रांनो या मंदिरा मागे एक दगड आहे ज्याच नाव आहे चिंतामणी दगड.

हे वाचा:   घरात लक्ष्मी खेचून आणते कासव..फक्त या योग्य ठिकाणी ठेवावे..वास्तूशास्त्र धनलाभ उपाय

हा दगड तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. फक्त तुम्हाला एक नाण घेऊन तुमचे दोन्ही हात यावर ठेवावे लागतत आणि मनातल्या मनात तुमचा प्रश्न स्मरण करावा लागतो त्या नंतर जे होते त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, अस होतं की जर तुमचं उत्तर हा असेल तर हा दगड उजव्या बाजूला वळतो आणि जर ना मध्ये उत्तर असल्यास दगड डाव्या बाजूला वळतो आणि जर दगड वळला नाही तर समजून जा उत्तर मिळण्यास अजून वेळ आहे. तुम्हाला विश्वास नसल्यास तुम्ही या तिर्थक्षेत्राला नक्की भेट द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply