मित्रांनो, अलीकडच्या काळात सर्वच लोकांना अगदी शाळेतील लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत महिला असो अगर पुरुष सर्वांनाच केसांचा प्रॉब्लेम सुरू आहे. कुणाचे केस गळतात, कुणाचे केस अकाली पिकतात, कुणाला टक्कल पडायला सुरू होते. केसांची वाढ होत नाही, केसात कोंडा होणे इत्यादी अनेक समस्यांनी लोक त्रासलेले आहेत. केमिकलयुक्त शाम्पू आणि तेलाचा वापर केल्याने या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. पुरुष असो वा महिला सर्वांनाच आपले केस दाट काळेभोर सुंदर असावेत असं वाटतं.
मित्रांनो सर्वच महिलांना आपले केस लांब सडक सिल्की मुलायम काळेभोर असावेत असं वाटतं ज्या स्त्रियांचे केस काळेभोर लांबसडक आहेत त्या कोणत्याही समारंभात किंवा कुठेही गेल्या तरी त्यांच्या केसांच्या मुळे आकर्षणाचा बिंदू ठरतात चला तर पाहूया आपण एक घरगुती सोपा उपाय ज्यामुळे आपले केस लांबसडक होतील.
मित्रांनो पूर्वीच्या काळी सर्व वयोगटातील पुरुष व महिला डोक्याला रोज तेल लावत होते. शिकेकाई आणि रिठा अशा आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करून केस धुतले जात होते. पूर्वीच्या काळी लोक तेलाने नियमित केसांना मसाज करत होते. केस धुण्यासाठी शिकेकाई रिठा आयुर्वेदिक गोष्टींचा, वनस्पतींचा उपयोग करत होते.
मित्रांनो पूर्वीच्या काळी लोक हिरव्या पालेभाज्या कडधान्य घरात पिकलेले तांदूळ ज्वारी गहू यांचा उपयोग जेवणात करत होते. त्यामुळे या लोकांना अकाली केस पिकणे गळणे दुभागणे टक्कल पडणे या गोष्टी माहितच नव्हत्या पूर्वीच्या लोकांचे आरोग्य खूप चांगले होते.
परंतु केसांच्या समस्या साठी कित्तेक लोक दवाखान्यात भरपूर पैसा खर्च करून केसांवर ट्रीटमेंट घेतात. काहींना फायदा होत पण काहीना अशा गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. मित्रांनो यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत यामुळे तुमचे केस लांबसडक आणि काळेभोर मुलायम होतील चला तर पाहूया काय आहे तो उपाय. मित्रांनो अनेकजणांना पांढरे केस होण्याच्या समस्येन त्रस्त आहेत. फक्त पाच रुपयात पांढरे केस काळे करण्याचा उपाय आपण पाहणार आहोत.
मित्रांनो, या उपायासाठी पाच रुपयाची तुरटी घ्यायची आहे. साधारणपणे तुरटीचे दोन छोटे तुकडे घ्यायचे आहेत. किंवा एक मोठा तुकडा असेल तरी चालेल. तो तुकडा घेऊन आपल्याला त्याची बारीक पावडर तयार करायची आहे. पावडर तयार करा. तुरटी आपल्या केसांच्या मजबुतीसाठी खूप उपयोगी आहे
मित्रांनो तुरटी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. म्हणून आपण साधारणपणे दोन चमचे आपण तुरटीची पूड या उपायासाठी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गुलाब पाणी किंवा गुलाब जल टाकायचे आहे. इंग्लिश मध्ये याला रोज वॉटर म्हणतात.
मित्रांनो तुरटीची पावडर आणि गुलाबजल एकजीव करून घ्या तयार झालेले मिश्रण केसांना लावा पाच मिनिट आपल्याला केसांवर याने मसाज करायच आहे. केसांच्या मुळाशी ते लागलं पाहिजे. हे मिश्रण साधारणपणे एक तास तसंच केसावर ठेवा आणि कोणत्याही चांगल्या शाम्पूने आपल्याला केस धुवा.
मित्रांनो, आठवड्यातून दोन-तीन दिवस हा प्रयोग करून पहा. त्याने तुमचे पांढरे केस होणार नाहीत. केस पांढरे झालेले असतील तर तेही काळे होतील. टक्कल पडणार नाही. केस गळती होणार नाही. केस मजबूत होतील. मुलायम होतील. एक केस गळतीवरच आणखीन एक उपाय आहे. तोही मी सांगणार आहे.
मित्रांनो हाच उपाय आहे तुरटी वापरूनच करायचा आहे. परंतु थोडासा वेगळा आहे. त्यासाठी काय करायचे आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये तुरटीची पूड टाकायची.
मित्रांनो हे मिश्रण सुद्धा केसांच्या मुळाशी जाईल असं केसांच्या स्कॅल्पला ते लावायच आहे. आणि पंधरा ते वीस मिनिटं तसंच ठेवून थंड पाण्याने फक्त थंड पाण्याने कोणताही शाम्पू वगैरे न वापरता थंड पाण्याने केस धुऊन टाकायचे. आठवड्यातून हाही प्रयोग तुम्ही दोन ते तीन वेळा करा. अगदी दुसऱ्या तिसऱ्या प्रयोगातच तुम्हाला फरक तर जाणवायला सुरुच होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.