बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक नामांकित सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या अफेअर्सची आजही चर्चा होते. यापैकी एक नाना पाटेकर देखील आहेत . नाना पाटेकर यांना आपण नेहमीच रागाच्या भरात आणि गंभीर मूडमध्ये पाहिलं असलं, तरी गतकाळातील अभिनेत्री आयशा झुल्कासोबतच्या त्यांच्या नात्याच्या बातम्या आजही ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकर यांच्या आयुष्याशी संबंधित अशाच काही रंजक गोष्टींबद्दल सांगत आहोत.
एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर अभिनेत्री मनीषा कोईरालाला डेट करत होते आणि याच काळात नाना पाटेकर यांनी अभिनेत्री आयशा झुल्काला डेट करायला सुरुवात केली. मनीषा कोईरालाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती नानांवर खूप चिडली. नाना पाटेकर यांच्यावरून दोन्ही अभिनेत्रींमध्ये जोरदार भांडण झाले होते.कोण आहे आयशा झुल्का?जेव्हा अभिनेता नाना पाटेकर अभिनेत्री मनीषा कोईरालाला डेट करत होते तेव्हा आयशा झुल्काने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आयेशाच्या सौंदर्यासमोर फक्त नानाच नाही तर अनेक बड्या स्टार्सनीही आपले मन दिले. अर्थात आज आयशाने फिल्म इंडस्ट्री सोडली असली तरी तिने आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘आँच’ या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत अभिनेत्री आयशा हिला कास्ट करण्यात आले होते. शूटिंगदरम्यान दोघेही खूप जवळ येऊ लागले. या चित्रपटानंतरच दोघांचे अफेअर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रेमकथेत ट्विस्ट आला जेव्हा मनीषा कोईरालाने नाना पाटेकरला आयशासोबत रंगेहाथ पकडले. हे बघून मनिषाचे हृदय तुटले. आयशाला नानासोबत बघून मनिषाला खूप राग आला. याच कारणामुळे दोन्ही अभिनेत्रींमध्ये खूप भांडण झाले होते. मनीषाने आयेशाला बरंच काही सांगितलं होतं.
सत्य बाहेर आल्यानंतर मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्यातही जोरदार भांडण झाले. त्यांच्या नात्यात कटुता आली. ज्यानंतर त्यांचे नाते तुटले. मनीषासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नानांनी आयशासोबतचे नाते सार्वजनिक केले. त्यानंतर दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले, पण नानांचे आयशासोबतचे नातेही टिकले नाही. बातम्यांनुसार, एका शूटिंगदरम्यान नानांनी आयेशावर हात उचलला होता. त्यानंतर दोघेही वेगळे झाले.
आयशा जुल्का हिचे नाना पाटेकरसोबतचे नातेही फार काळ टिकले नाही. आयशाने 2003 मध्ये कन्स्ट्रक्शन टायकून समीर वाशीशी लग्न केले आणि त्यानंतर इंडस्ट्रीपासून दूर गेली. लग्न झाले तेव्हा आयशा तिच्या करिअरच्या शिखरावर होती. लग्नानंतर ती इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर गेली. आयशाने कोणत्याही मुलाला जन्म दिला नाही.