मित्रांनो, थंडीच्या दिवसांमध्ये त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला डॉक्टरांकडून दूध व हळद याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण हळद आणि दुध रात्री झोपताना पिल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे काय काय फायदे होतात हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. थंडीच्या दिवसात हळद आणि दूधाचा खूप फायदा होतो. हळद हा एक असा घटक आहे, जो प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात असतोच. हळदीत आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहेत. याशिवाय अँटी सेफ्टीक आणि अँटी बायोटिक गुणधर्म असतात.
याचबरोबर दूधालाही कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे दूध आणि हळद एकत्र आले तर याचे गुणधर्म आणखी वाढतात. दूध आणि हळदीत कॅल्शिअम, आर्यन, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरची मात्रा असते. हळदीच्या दूधाने रोगप्रतीकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी थंडीच्या दिवसात नियमित हळद घातलेले दूध घ्यावे. तुम्हाला सांधेदुखी किंवा कंबर दुखी यांसारखा त्रास असेल तर तुम्ही आणि दूध रात्रीच्या वेळी झोपताना प्यावे यामुळे तुमचा हा त्रास हळूहळू कमी होईल.
रात्रीच्या वेळी दूध आणि हळद यांचे सेवन केले तर आपल्या त्वचेमध्ये सुद्धा चमक निर्माण होते आणि आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या शरीराला ऍलर्जीमुळे फंगल इन्फेक्शन मुळे खाज येत असेल आणि आपल्या शरीरावर काळे किंवा पांढरे डाग उठले असतील तर त्यांचे प्रमाणही दुध आणि हळदीचे सेवन केल्यामुळे कमी होते. जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर दूध आणि हळदीचे नियमितपणे सेवन केल्यामुळे तुमची ही समस्या देखील लवकरात लवकर कमी होईल.
दुधामधील कॅल्शियम मुळे आणि हळदीतील अँटिबायोटिक या घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडे देखील मजबूत होतात. मित्रांनो जर तुम्ही मोबाईल,कॅम्पुटर याचा जास्त वापर आपल्या जीवनशैलीमध्ये करत असाल किंवा आपल्या ऑफिसमध्ये करत असाल तर यामुळे तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होत असतो. परंतु जर आपण हळद आणि दूध रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी घेतले तर यामुळे आपल्या झोपे संबंधितही सर्व समस्या दूर होतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारची झोप येण्यास मदत होते.
दूध आणि हळद यांचे एकत्रित सेवन केल्यामुळे आपल्या पोटा संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.जर तुम्ही दररोज रात्री हळदीचं दूध प्यायलात, तर तुम्ही वजन खूप लवकर कमी करू शकता. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्याच्या आधी जर तुम्हाला भूक लागली, तर हळदीचे दूध पिणे योग्य आहे. आपल्यातील बरेच लोक दुधात हळद पावडर मिसळून पितात. हळद पावडरीपेक्षा हळकुंड अधिक परिणामकारक आहे. हळकुंडाबरोबर काळी मिरी आणि पांढरी मिरची एकत्र करून बारीक केल्यास उत्तम.
त्याचबरोबर ज्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजार किंवा समस्या आहेत. त्यांनी जर रात्री झोपताना दुधाबरोबर हळद घेतली तर त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. यामुळे आपले रक्त पातळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर दूध आणि हळद यांचे सेवन केल्यामुळे आपल्या श्वासा संबंधित ही सर्व विकार दूर होतात. मित्रांनो अशी ही गुणकारी असणारे आणि हळदीची पेय आपल्याला दररोज रात्री झोपताना दिलेच पाहिजे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.