आलिया-रणबीरनंतर रश्मिकाचंही शुभमंगल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात?

मनोरंजन

आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त, तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबतच्या त्याच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हटली जाणारी रश्मिका मंदान्नाही तिच्या विजयसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. काहि दिंवसांपुर्वीच दोघंही मुंबईत डेटवर जाताना दिसले होते.

   

त्यांच्या अफेअरच्या चर्चानंतर त्यांच्या आता लग्नाच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत.या वर्षाच्या अखेरीस दोघंही लग्न करू शकतात. अशी चर्चा विजय आणि रश्मिकाचे चाहते सोशल मीडियावर करत आहेत. चाहते दोन्ही अभिनेत्यांच्या लग्नापर्यंत पोहोचले असले तरी अद्याप रश्मिका किंवा विजय या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

रश्मिका आणि विजयने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटात त्यांची जोडी खूप पसंत केली जात होती. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

हे वाचा:   सर्वाना हसवणारा अभिनेता सतीश कौशिक यांचे निधन...कशामुळे झाला मृत्यू..कारण जाणून लोक हळहळ व्यक्त करत आहेत पहा..

विजय देवरकोंडा अनन्या पांडेचा ‘लायगर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत झालं. रश्मिका मंदान्ना सध्या विकास बहल दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच रश्मिका अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात दिसली होती.

Leave a Reply