बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दररोज चर्चेत असते. वर्ल्ड ब्युटी असलेल्या ऐश्वर्याचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या सौंदर्यावर लाखो लोकं वेडे आहेत. तिच्या करिअरच्या शिखरावर असताना, ऐशने अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं.
2007 मध्ये दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्न झाल्यापासून ऐश्वर्याने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिचं प्रोफेशनल आयुष्य उत्तम प्रकारे सांभाळलं आहे. तिचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत खूप चांगले संबंध आहेत. मात्र, एकदा ऐश्वर्याने असं कृत्य केलं की, अमिताभ बच्चन यांनी तिला फटकारलं.
खरंतर हे प्रकरण 2015 सालचं आहे. ऐश्वर्या राय तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्टारडस्ट अवॉर्ड्समध्ये पोहोचली होती. या फंक्शनमध्ये तिला तिच्या कमबॅक चित्रपट ‘जज्बा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांना ‘पा’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला.पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय खूप खूश होती.
जेव्हा ती अमिताभ बच्चन यांच्याकडे पोहोचली तेव्हा ती त्यांना लहान मुलासारखी हाक मारू लागली. पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात ऐश हे विसरून गेली आणि सगळ्यांसमोरच तिने तिचे सासऱ्यांना आनंदाच्या भरात गालावर किस केलं.
ऐश्वर्याचं हे वागणं अमिताभ बच्चन यांना आवडलं नाही. यावेळी ते थोडे अस्वस्थही दिसत होते. अशा स्थितीत त्यांनी ऐश्वर्याला थांबवलं आणि ‘आराध्यासारखं वागणे बंद कर’ असंही सांगितलं.
आम्ही तुम्हाला सांगतो की, ऐश्वर्या रायचं तिच्या सासूसोबत खूप चांगलं बाँडिंग आहे. ऐश तिच्यासोबत अनेकवेळा दिसली आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन देखील ऐशला आपली सून नव्हे तर आपली मुलगी मानतात. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ऐश्वर्याने तिचं कुटुंबाला मनापासून जवळचं मानलं आहे आणि ती खूप साधी आहे.
इतकंच नाही तर करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये जया बच्चन म्हणाल्या होत्या की ऐश्वर्या घरी परतल्यावर अमिताभ यांचा चेहऱ्या प्रफुल्लित होतो.