“तारक मेहता का उलटा चस्मा” ही मालिका कायमची बंद करा, ‘या’ कारणासाठी मालिका होतेय TROLL.!

मनोरंजन

घराघरात पाहिली जाणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळं ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीनं पाहतात.

   

मुंबईतल्या गोरेवात परिसरातील काल्पनीक अशा पावडर गल्लीतल्या गोकूळधाम सोसायटीभोवती फिरणारी ही मालिका असल्यानं सगळ्यात वयोगटातील प्रेक्षकांना ही मालिका अधिक भावते.

पण गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्यी १३ ते १४ जे कलाकार या मालिकेशी जोडले गेले होते, त्यांनी आता मालिकेला राम-राम ठोकलाय.

हे वाचा:   हुबेहुब सलमान खानसारखा दिसतो मलायका आणि अरबाजचा मुलगा; व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा..

काही कलाकरांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळं मालिका सोडली, तर काहिंनी निर्मात्यांसोबत मतभेद निर्माण झाल्यामुळं मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपूर्वी या मालिकेमुळं प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली.

मालिकेत ते तारक मेहता हे पात्र साकारत होते. त्यांची जागा आता अभिनेता सचिन श्रॉफ यानं घेतली आहे. पण नवीन मेहता साहब पाहून प्रेक्षक मात्र फार खूष नाहीत.

शैलेश लोढा यांनी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ते या मालिकेचे सूत्रधारही होते. त्यामुळं त्यांच्या जागी कोणता अभिनेता ही भूमिका साकराणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर नवीन मेहता साहब प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण प्रेक्षक मात्र नाराज झाल्याचं चित्र आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply