Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकून तुम्हाला पण येईल चक्कर

मनोरंजन

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत आहे. बिग बींविषयीच्या खाजगी आणि वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुत असतात. ते अनेकवेळा लग्झरी लाइफमुळेही चर्चेत असतात.

   

नुकतंच अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगले परिसरातील नवीन घर खरेदी केलं आहे. त्यामुळे बिग बी सध्या त्यांनी खरेदी केलेल्या नव्या मालमत्तेमुळे चर्चेत आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगला परिसरात नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. येथील पार्थेनॉन इमारतीच्या 31व्या मजल्यावर त्यांनी एक आलिशान घर घेतलं आहे. या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर हे घर 12 हजार स्क्वेअर फुटचे आहे.

 बिग बींनी हा संपूर्ण मजला विकत घेतला आहे, ज्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. हे 4 bhk अपार्टमेंट आहे, ज्याच्या बांधकामात देखील पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

हे वाचा:   एकता कपूर ची या टिव्ही अभिनेत्रींबरोबर आहे जीवापाड मैत्री, एकीला तर बनवणार होती आपली वहिनी.!

पार्थेनॉन इमारतीतील या बंगल्याची किंमत जवळपास 31 कोटी रुपये आहे. मात्र, बिग बी यांच्याकडे मुंबईत त्याहूनही महागड्या मालमत्ता आहेत. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आधीच 6 बंगले आहेत. पहिला ‘जलसा’, जो सुमारे 10 हजार स्क्वेअर फूट पसरलेला आहे. या घरात तो आपल्या कुटुंबासह राहतो.

 दुसरा बंगला ‘प्रतीक्षा’ आहे, जिथे तो ‘जलसा’मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसोबत राहत होता. तिसरा बंगला ‘जनक’ आहे, जिथे त्याचे कार्यालय आहे आणि चौथा बंगला ‘वत्स’ आहे. या सगळ्याशिवाय 2013 मध्येही त्यांनी ‘जलसा’च्या मागे 60 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. सहावी मालमत्ता, जी त्याने गेल्या वर्षी खरेदी केली होती.

दरम्यान, बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सोबतच कलाकारांच्या आलिशान घराबाबत लोकांना फारच आकर्षण असतं.

Leave a Reply