‘तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड…’, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव.!

मनोरंजन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जिला पहिल्याच मालिकेतून लोकप्रियता मिळाली. आज या अभिनेत्रीला तिच्या खासगी आयुष्यापेक्षा तिच्या कामामुळे आणि तिच्या खऱ्या नावा ऐवजी तिच्या मालिकेतील नावांसाठी ओळखतात. मात्र, तिच्या आयुष्यात देखील अनेक चढ उतार आले आहेत. तिलाही इतरांप्रमाणे प्रेमात धोका मिळाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण? तर तिचं नाव दिव्यांका त्रिपाठी आहे. दिव्यांका ही अशा काही कलाकारांमध्ये आहे जी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.

   

मात्र, आता तिचं काही मोठं काम कोणाला पाहायला मिळत नाही आहे. 2019 नंतर दिव्यांका कोणत्या मोठ्या मालिकेत दिसली नाही. आता ती वेब सीरिजमध्ये तिचं नशिब आजमावताना दसत आहे. 2021 मध्ये ती ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये दिसली होती. मात्र, ती विजेती ठरली नाही. दरम्यान, दिव्यांका ही तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

हे वाचा:   माधुरी दीक्षितला नकार देत सुरेश वाडकर यांनी या सुंदर गायिकेशी लग्न केले, पाहा फोटो....

दिव्यांकाला तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप काही सहन करावं लागलं आणि तिनंही संघर्ष हा केलाच आहे. करिअरच्या सुरुवातीला तिला काम देताना एक व्यक्ती म्हणाला होता की तुला त्या दिग्दर्शकासोबत रहायचं आहे, त्यानंतरच तुला मोठा ब्रेक मिळेल. याचा खुलासा अनेक वर्षानंतर दिव्यांकानं राजीव खंडेलवालच्या शोमध्ये केला. मात्र, दिव्यांकाला तिच्या प्रतिभेवर विश्वास होता आणि त्यामुळे ती म्हणाली की जर तुमच्यात टॅलेन्ट असेल तर तुम्हाला कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाण्याची गरज नाही.

दिव्यांकाच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर तिनं 2004 मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमातून एक स्पर्धक म्हणून पदार्पण केलं होतं. त्याच्या 2 वर्षानंतर ती ‘खाना खजाना’ आणि ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकांमध्ये दिसली. त्यापैकी ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेत तर तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर दिव्यांकानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ती ‘मिसेज एंड मिस्टर शर्मा इलाहाबादवाले’ या मालिकेत देखील दिसली होती. या मालिकेतील सहकलाकार शरद मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होत्री. 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.

हे वाचा:   अक्षया देवधर लवकरच देणार आनंदाची बातमी.. त्या एका पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता.!

करिअकच्या चांगल्या टप्यावर आल्यानंतर प्रेमात धोका मिळाल्यानंतर दिव्यांकानं 8 जुलै 2016 मध्ये तिचा सह-कलाकार विवेक दहियाशी लग्न केलं. विवेक हा देखील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये तो दिसला आहे. तर आता तो चित्रपटांमध्ये त्याचं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Reply