गाऊन घालून गावात हिंडत सुटलेय हेमांगी; म्हणाली, कपड्यांवरून कुणाची मापं….

मनोरंजन

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर सक्रीय असते. कायम ती तिचे विचार, तिची मत, तिचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असते. हेमांगीच्या एका पोस्टची पुढचे काही दिवस चर्चा होत राहते. सध्या सगळेच कलाकार कामातून ब्रेक घेऊन उन्हाळी सुट्ट्यांवर गेले आहेत. हेमांगी देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी हेमांगी थेट तिचं गाव गाठलं आहे. साताऱ्यातील म्हसवड गावच्या घराचे फोटो शेअर करत हेमांगीने खास पोस्ट देखील शेअर केली आहे. हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने घातलेल्या कपड्यांवरून तिला ट्रोल करणार हे माहिती असल्यानं तिनं आधीच टोमणा मारून बिनधास्त फोटो पोस्ट केलेत. काय म्हणालीये हेमांगी पोस्टमध्ये पाहूया.

   

अभिनेत्री हेमांगी कवीचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिला गावची फार ओढ आहे. सुट्ट्यांमध्ये गावी जाणं, तिथली संस्कृती, शेती करणं अशी सगळी काम तिने केली आहेत. आपल्या गावाचं कौतुक ती नेहमीच करत असते. दरम्यान यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हेमांगीनं गावी गाणं पसंत केलं आहे. हेमांगीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं गावचं घर दिसत आहे. घरासमोर रांगोळी घातलेली आहे आणि हेमांगीनं मॅक्सी किंवा गाऊन परिधान केला आहे. घरच्या साध्या अवतारातील फोटो हेमांगीनं शेअर केलेत.

हे वाचा:   अभिनेत्री स्वानंदीनं दिली आपल्या प्रेमाची कबुली; खुपच टॅलेंटड आहे टिकेकरांचा होणारा जावई..!

पोस्ट शेअर करत हेमांगीनं लिहिलंय, जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीनं पुढे म्हटलंय, जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत.

हे वाचा:   मूल नको म्हणून या अभिनेत्रीनं दिला डॉक्टर नवऱ्याला घटस्फोट; नंतर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार.!

गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे! या पोस्टसह शेअर केलेल्या फोटोसाठी हेमांगीने टोला लगावत तळटीप लिहिली आहे, कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती, असं हेमांगीने म्हटलंय. तिच्या या तळटिपेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Leave a Reply