“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, अभिनेत्रीने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण माझ्यावर..”

मनोरंजन

बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी इशा तिची मतं मांडत असते. आता तिने अभिनयसृष्टीतील कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. तसेच तिने तिच्याबरोबर घडलेल्या दोन प्रसंगांचा उल्लेखही केला.

   

इशाला एका निर्मात्याने तडजोड करण्यास सांगितलं होतं, पण तिने नकार दिला होता. या प्रसंगाचा उल्लेख करत इशा म्हणाली, “चित्रपट अर्धा शूट करून झाला होता. मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने निर्मात्याला सांगितलं की मला त्याला मी चित्रपटात नको आहे मग मी सेटवर काय करत आहे? यानंतर काही निर्मात्यांनी मला चित्रपटात कास्ट करण्यासही नकार दिला. जर मी काहीच तडजोड करणार नसेल तर मला चित्रपटात घेण्याचा काय फायदा? असंही या निर्मात्यांना माझ्याबद्दल बोलताना मी ऐकलं होतं.”

हे वाचा:   सैफ अली खान ची पत्नी 2 मुलांची आई असून सुध्दा घालवत आहे दुसऱ्या पुरुषासोबत रात्र, या पुरुषाचे नाव ऐकून दंग व्हाल

अभिनेत्रीने आणखी एका घटनेचा उल्लेख केला. तेव्हा ती आउटडोअर शूट करत होती. त्यावेळी दोन लोकांनी कास्टिंग काउचचा सापळा रचला होता, असा दावा तिने केला. “दोघे जण कास्टिंग काउचचा सापळा रचत होते. मला त्याबद्दल माहीत झालं होतं, पण तरीही मी तो चित्रपट केला होता.

कारण त्यांच्या बाजूने ही एक छोटीशी चाल होती. आऊटडोअर शूटच्या वेळी मी त्यांच्या सापळ्यात अडकेन असं त्यांना वाटत होतं. मी पण हुशार होते, मी म्हणाले की मी एकटी झोपणार नाही. मी माझ्या मेकअप आर्टिस्टला माझ्या खोलीत झोपायला बोलावले,” असं इशा गुप्ताने सांगितलं.

कास्टिंग काउचचे अनुभव सांगताना चिडलेली इशा गुप्ता म्हणाली, “त्यांना वाटतं की आम्हाला काम हवं असेल तर आम्ही काहीही करू शकतो.” तसेच कास्टिंग काउचसारख्या गोष्टी स्टार किड्सबरोबर घडत नाही, असंही तिने नमूद केलं. एखाद्या निर्मात्याने स्टार किड्सबरोबर असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे पालक निर्मात्यांना मारतील, असं इशा म्हणाली.

Leave a Reply