राणादा पाठकबाईंना घेऊन चढला गड, नंतर तलवारही उचलली अन्…; विडिओ पहा….

मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे हार्दिक जोशी-अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले. काही महिन्यांपूर्वी अक्षया आणि हार्दिकने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर आता त्या दोघांनी जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले.

हार्दिक जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक हा जेजुरीला जाताना पाहायला मिळत आहे. यानंतर तो अक्षयाला पाच पावलं उचलून घेऊन जेजुरी गड चढताना दिसत आहेत. यामुळे त्याने जेजुरीची परंपरा जपली आहे.

यावेळी हार्दिकने जेजुरीच्या खंडेरायाची ४२ किलोची तलवार उचलली. यावेळी त्या दोघांनी एकत्र पूजा केली. तसेच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत भंडाराही उधळला. यादरम्यान त्यांच्या अनेक चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी केली होती.

हार्दिकने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर अक्षयाने तिच्या आईची २५ वर्षं जुनी केशरी रंगाची साडी नेसली होती. हार्दिकने या व्हिडीओला “येळकोट येळकोट जय मल्हार….”, असे कॅप्शन दिले आहे.

हे वाचा:   हिरोईन केवळ चेहऱ्यावरच नाही तर या भागांवरही करतात मेकअप, पाहा आतील काही न पाहिलेली छायाचित्रे

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही २ डिसेंबर २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले. सध्या ते दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत. हार्दिक हा लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात झळकणार आहे.

Leave a Reply