मित्रांनो माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख दोन्ही सामान परीने येत-जात असतात. कधी चढ असतो तर कधी उतार या सगळ्या शिवाय आयुष्याला काही मज्जा सुद्धा नाही. मात्र काही घरामध्ये फक्त नैराश्य आणि दु:ख कधी कमीच होत नाही असे तुम्ही ही पाहिले असेल तथा तुमच्या निदर्शनात आले असेल.
या मागचे मूळ कारण आहे आपल्या घरातील वास्तुशास्त्र होय आपल्या घरातील वास्तुशास्त्र जर योग्य नसेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रात अश्या काही गोष्टी आहेत ज्या मुख्य दरावाज्या पाशी असण्याने आपल्या घरात अनेक आर्थिक तथा मानसिक संकटे येवू शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या वस्तू ज्यांना मुख्य दरवाज्यापाशी ठेवताच तुमच्या आयुष्यात नैराश्य येईल.
मित्रांनो मुख्य दरावाज्या समोरुन जर कोणता ही सरळ रस्ता जातं असेल तर हा वास्तु शास्त्राच्या अनुसार खूप मोठा वास्तु दोष मानला जातो आणि असे असल्यास तुम्हाला धन-हानि होण्यास सुरवात होईल. तसेच जर तुमच्या घरच्या मुख्य दरवाज्या समोरुन जर एखादा नदी किंवा नाला जातं असेल तर हा सुद्धा एक मोठा वास्तु दोष मानला जातो अश्या प्रकारची स्थिती घरासमोर असल्यास तुम्हाला तुमच्या घरात कधीच शांतत लाभणार नाही सतत घरात भांडण-तंटा होताना दिसून येतील.
त्याच प्रकारे घराच्या मुख्य दरवाज्या असलेल्या भिंतीवर घड्याळ असणे सुद्धा अतिशय अशुभ मानले जाते असे असल्यास मित्रांनो आत्ताच सावध व्हा कारण ह्या घड्याळामुळे ज्या मान-सन्मानचे तुम्ही पात्र आहात ज्या स्तुतीची तुम्ही वाट बघतात ती तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही तुमच्या वाटेला नेहमीच निराशा येईल. आर्थिक संकटे अशी येतील की जे तुम्ही कमवले आहे ते सगळेच गमवावे लागेल.
मित्रांनो तसेच घराच्या मुख्य दारासमोर एखाद्या देवाचे मंदिर असणे अनेकांना शुभ वाटते परंतू वास्तु शास्त्राच्या माते हे सुद्धा आपल्या व आपल्या कुटुंबासाठी आपत्तीजनक ठरू शकते. हा सुद्धा एक मोठा वास्तुदोष आहे आणि याच्या फलस्वरूप तुम्हाला संतानप्राप्ती करण्यासाठी अनेक प्रकारच्या बाधा येवू शकतात तसेच तुम्ही कोणते ही शुभ कार्य करत असाल तर त्यात अनेक विघ्न येतील.
त्याबरोबरच मुख्य दारासमोर एखादे मोठे झाड असल्यास त्याची सावली दरवाज्यात पडल्यास तुमच्या घरावर अनेक संकटे येतील तथा घरात नेहमी कोणी ना कोणी नेहमीच आजारी पडत राहतील. घरचा कर्ता पुरुषाला नोकरी धंद्यात कधी बढती मिळत नाही समाजात अपमानास्पद घटना घडत राहतील.
म्हणूनच मित्रांनो जेव्हा ही घर बांधाल अथवा खरेदी कराल तेव्हा वास्तु शास्त्राचा नक्की विचार करा. जर आपल्या घरातील वास्तु योग्य असेल तर आपले आयुष्यसुद्धा आनंदाने भरुन जाईल तथा धन-लाभ आणि समृद्धी यांचा वास होण्यास सुरवात होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.