नमस्कार मित्रांनो, मानवी जीवनात अनेक महत्त्वाच्या गरजा असतात. पण त्यामध्ये काही वेळा त्या गरजा माणूस पैशाच्या अभावी पुर्ण करू शकत नाही किंवा त्याची काही स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तेव्हा काही वेळेस आपली गरज कर्जाच्या हप्त्यांच्या शाश्वतीवर पूर्ण करावी लागते. कर्ज घेण्याची कोणाचीही मनापासून इच्छा नसते.
पण आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण या पर्यायाचा उपयोग करतो आणि कर्ज घेतो. काही वेळेस अशी परिस्थिती येते की हे कर्ज थकीत पडते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पैसे येण्याचे मार्ग अडून राहतात व घरातील पैसा टिकत नाही.
याचा परिणाम असा होतो की या कर्जाच्या डोंगराखाली काही जण दबून जातात. यावर आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सांगितलेला एक उपाय जर केला तर तुमची यातून सुटका होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपण मंगळवारी कधीच कर्ज घेऊ नये. कारण ते लवकर फिटत नाही आणि चुकून कर्ज घेतले तर याचा हप्ता देण्यासाठी हाच दिवस निवडा.
मंगळवार प्रमाणे शुक्रवारी सुद्धा कर्ज फेडण्यासाठी शुभ मानले जाते. याच बरोबर काही ज्योतिष शास्त्रानुसार किंवा उपायानुसार आपण लवकर कर्ज फेडू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जर या दिवशी कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याला 5 ते 10 हजार रुपये लगेच परत करा.
ज्योतिष शास्त्रामध्ये कर्ज मुक्तीसाठी भगवान गणेश यांचं खूप महत्त्व दिले आहे. जी व्यक्ती गणेशाची रोज पूजा करते आणि याचबरोबर श्री हनुमानाची पुजा दर मंगळवारी केल्याने कर्ज मुक्ती मिळते. हनुमान भगवंताच्या पुजेच्या प्रसादात म्हणून लवंग अर्पण करावे. लाल मसुरीच्या डाळीचे दान करावे.
स्वामी समर्थ सांगतात की बुधवारी कोणालाही पैसे देऊ नये कारण ते पैसे एक तर बुडतात किंवा वसुलीसाठी त्रास करतात. गुरुवारी हा पैसे देण्यास चांगला आहे. 5 गुलाबाची फुले आपल्या उजव्या हातात घेऊन देवापुढे 108 वेळा गायत्री मंत्रजप करावा आणि त्यानंतर ती फुले जवळच्या वाहत्या पाण्यात सोडावे.
हे काही उपाय केल्याने तुमचे कर्ज लवकर फेडायला मदत होते. कारण भगवान श्री गणेशजी आणि हनुमान यांच्या कृपेने आणि तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या उपायांनी तुम्हाला कर्ज मुक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमची कर्जातून मुक्ती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.