बऱ्याच महिलांना पाळीच्या वेळी पोटात दुखणे, पायात गोळे येणे, ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे अशा समस्या असतात. या समस्या हार्मोनल इनबॅलन्स मुळे होतात. लहान मुलींनाही हा त्रास होत असतो. आयुर्वेदानुसार शरीरात होणाऱ्या कोणत्याही वेदना या वातामुळे होतात. शरीरात असणाऱ्या वात पित्त कफ या त्रिदोषांपैकी वात दोष जर वाढला तर शरीरात वेदना होतात.
पूर्वीच्या काळी पाळी आली की महिलांना वेगळं बसवलं जात होतं त्यांनी घरचं कोणतेही काम करण्यास मनाई होती. देवपूजा करणे देवाला जाणे किंवा अशा बऱ्याच गोष्टी होतं की महिलांनी पाळी झाल्यानंतर जाणे विटाळाचा मानले जाई. आत्ताची मॉडर्न लोक याला थोतांड म्हणतात पण याचा उद्देश महिलांना विश्रांती देणे हाच होता. कारण त्या काळात महिलांना भरपूर बंधने होती आपलं मत व्यक्त करण्याची त्यांना परवानगी नव्हती. म्हणूनच या काळातील विश्रांतीची गरज भागविण्यासाठी धर्मातील नियमाच्या नावाखाली महिलांची चांगली सोय केली गेली.
अलीकडच्या मॉडर्न जमान्यात टीव्हीवर आपण जाहिराती पाहतो. त्या मध्ये पॅड वापरून तुम्ही त्यात मुली नाचताना पाहता. पळताना पाहता नाच गाणं करताना पाहता. व्यायाम करताना पाहता पण हे पूर्ण चुकीचा आहे मैत्रिणींनो. साधी बोटाला एखादी जखम झाली आणि त्यातून रक्तस्राव होत असेल तर आपण किती जपतो. आणि या काळात तर चार दिवस आपण या प्रक्रियेतून जात असतो. मग विचार करा तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे जाहिरात बघून नाच करणे पडणे या गोष्टी अजिबात करू नका.
पाळी सुरू असताना आणि नेहमी सुद्धा महिलांनी हिरव्या भाज्या, सलाड, कोशिंबिरी, दही, ताक, दूध यांचं सेवन केलं पाहिजे. तसेच साधारण चाळीस मिनिटे रोज फिरायला जाणे आवश्यक आहे किंवा इतर कोणताही व्यायाम तुम्ही एक तास भर घरी केला तरी चालेल यामुळे देखील आपले शरीर तंदुरुस्त होईल आणि होणारे त्रास निघून जातील किंवा बंद होतील.
मैत्रिणीनो या उपायासाठी गॅसवर एक पातेले ठेवा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घाला त्यानंतर एक चमचा बडीशेप थोडीशी कुटून पाण्यात टाका तसेच गुळाचा एक खडा सुद्धा टाका या उपायासाठी सेंद्रिय गुळ वापरणे आवश्यक आहे. हे पाणी चार-पाच मिनिटे उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी ग्लासमध्ये ओतून घ्या आणि थोडं कोमट झाल्यानंतर किंवा तुम्हाला सोसेल गरम असताना प्यायच आहे. हा उपाय सलग सात ते आठ दिवस करा. या उपायाने तुमच्या पाळीच्या सर्व समस्या दूर होतील पाळी वेळच्या वेळी येईल.
मैत्रिणीनो बडीशेप आणि गूळ घालून तयार केलेले हे पाणी कोमट असताना आपल्याला प्यायचा आहे तसेच बडीशेप चावून चावून खायची आहे. हा उपाय सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. हा उपाय तुम्ही सलग सात ते आठ दिवस केल्याने तुमच्या पाळीच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे हा उपाय पाळीच्या तारखेच्या आधी चार दिवस सुरू करायचा आहे आणि पाळी सुरू झाल्यावर पुन्हा तीन दिवस असे एकूण सात दिवस हा उपाय करायचा आहे मासिक पाळीच्या दिवसात काही त्रास होतात ते त्रासही या उपायाने होत नाहीत.
मैत्रिणीनो मासिक पाळीच्या काळात खूपच त्रास होत असेल वेदना होत असतील किंवा इतर काही समस्या असतील तर या उपायांबरोबरच आपण अजून एक उपाय करायच आहे. तो म्हणजे दोन चमचे मध अगदी कोमट पाण्यात घालून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेस प्यायचा आहे. हा उपाय देखील आपण पाळी सुरू असताना करायचा आहे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.