या निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत एक जादूच आहे. प्रत्येक गोष्ट खूप उपयोगी आहे. निसर्गात विवीध प्रकारची झाडे, फुले असतात. त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. सोण्यापेक्षा ही फुले खूप मौल्यवान आहेत. ही फुले आपले रोग अगदी सहजपणे मुळापासून दूर करतात. त्यामध्ये जे खूप उपयुक्त असे हे जास्वंदीची फुले.
घरगुती औ’षधी साठी ही खूप फायदेशीर आहेत. आपल्या घरच्या परिसरात जास्वंदाच्या फुलाचे रोप असते. लाल ,पिवळी, गुलाबी या विविध रंगामध्ये ही फुले आढळतात. यातील लाल रंगाची जास्वंदी फुले औषधासाठी वापरली जातात. त्यामध्ये ही जास्वंदीची मोठी गेंडेदार फुले वापरू नये. पाच पाकळ्यांची साधी फुले वापरावी.
केस गळती साठी जास्वंदी फुल हे रामबाण उपाय आहे. केस वाढण्यासाठी , त्याच बरोबर मुलायम राहण्यासाठी कांद्याचा रस आणि खोबरेल तेल फार उपयुक्त आहेत. त्यासोबत जास्वंदाचे तेल केसांना लावून पहा. तुम्हाला नक्की फरक पडेल. यामुळे केस गळतीचे प्रमाण कमी होते.
तुम्हाला घरी कसे जास्वंदी चे तेल करायचे हे पाहणार आहोत. कृती: जास्वंदीची दहा ते पंधरा पाने घ्या आणि शंभर ग्राम खोबरेल तेल कमी गॅसवर गरम करायचा. त्याचा रंग लाल होईल त्यानंतर गॅस बंद करा. तेल थोडे थंड करून चाळणी ने गाळून घ्या .
त्यानंतर एक बोटेल मध्ये भरून ठेवा. याचा तुम्ही नक्की वापर करा, यामुळे केस गळती कमी होईल . केसांना शायनिंग देखील येईल. याचा तुमच्या केसांना खूप मोठा फायदा होईल . या फुला तील पुढच्या भागामध्ये पुंकेसर असतो. यामध्ये मध असतो. ते तुम्ही खाल्ल्यास त्यामुळे तुमची शा’रीरिक दुर्बलता कमी होते. ही फुले खूप मौल्यवान आहेत.
ही फुले कधी खायची आहेत? :- ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्या लोकांनी सेवन केल्यास उत्तम होईल. सर्दीच्या कालावधीत खायचे नाही. त्यामुळे कफ निर्माण होवू शकते. हे फुल आपण चावून मग खायचे आहे. फुलाच्या मागे असणारी हिरवी देट असते ती काढून टाकायची. तसेच पुंकेसर काढून टाकायचे. त्यानंतर फुलाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून मगच खायचे.
ज्या लोकांना उन्हाळी लागते म्हणजे मु’त्र नलिकेत दाह होतो. त्यासाठी एकदम हा एक उपयुक्त उपाय आहे. अश्या लोकांनी
याचे सेवन केली तरी उत्तम होईल. ज्यांना एसिडीटी त्रास आहे त्यांना ही याचे सेवन केल्यास खूप फायदेशीर ठरेल. ज्या स्त्रिया ग’र्भावस्थेत आहेत त्यांनी ही फुले खावू नये.
डिलिव्हरी झालेल्या महिलांना तर अजिबात सेवन करू नये. या फुलांचा वापर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात करावे. इतर वेळी कमी प्रमाणात करावे. या फुलांचा चहा बनवून देखील पिवु शकता. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
उष्णता कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. ज्यांना बी पी आहे त्यांनी याचे सेवन करू नये. डोळ्याची नजर कमी झाली आहे, अश्या लोकांनी याचे सेवन करून पहा. तुम्हाला फरक वाटला तर हा उपाय तुम्ही पुढे सुरू ठेवू शकता. कारण त्या फुलांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच बरोबर कॅरोटीन चे प्रमाणही जास्त आहे. ते डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे.
जास्वंदीच्या फुलांची तीन ग्रॅम पावडर गरम पाण्यासोबत सकाळी व संध्याकाळी घ्यायची. जास्वंदीची दोन-तीन फुले आणि ग्लासभर गोमूत्र घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. रात्री झोपताना केसांना लावल्यास केस काळे होतात. यामुळे केस मजबूत व शायनिंग होतात. एकदा करून पहा हा उपाय खूप उपयोगी आहे.
जास्वंदीची दोन ते चार पाने पाण्यामध्ये उकळून त्याची पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लेपन करून दहा मिनिटाने चेहरा धुवा. चेहरा एकदम तजेलदार दिसेल. जर तुम्हाला यूरिक एसिड ची समस्या असेल, दूर करण्यासाठी योगासन, कपालभाती, प्राणायम केल्यास त्याच बरोबर फिरायला गेल्यास तुमचे आ’रोग्य उत्तम राहील.
किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी नारळाचे पाणी, तिळाच्या पानांची भाजी त्याचे सेवन करा. जास्वंदीचे दोन फुले एक ग्लास पाण्यात उकळून त्यामध्ये लिंबू पिळावे व त्यात मध टाकून त्याचे सेवन करावे. पण गरम पाण्यात मध अजिबात टाकू नका. कारण गरम पाण्यामध्ये मध टाकल्यास ते वि’षे समान असते.
गरम पाण्यात फुलांच्या पाकळ्या टाकल्या नंतर उकळून थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकावे. व नंतर त्याचे सेवन करावे त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. जास्वंदीची फुले खाल्ल्यास गॅस ची समस्या दूर होते. असे अनेक जास्वंदीच्या फुलांचे उपयोग आहेत. माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद.