नवरात्री मध्ये कोणत्याही दिवशी; छोट्या कन्येला द्या ही १ वस्तू..आपले भाग्य चमकेल..पैशाच्या सर्व स’मस्या संपतील

अध्यात्म

सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, नवरात्रीतील नऊ दिवसात दुर्गा मातेची पूजा केल्याने माता प्रसन्न होते. आपल्याला मनोवांछित वरदान देत आपल्या मनातल्या इच्छांची पूर्तता करते. अनेकजण नवरात्रीचे व्रत करतात, उपवास करतात, मात्र कन्या पूजनाचे महत्त्व हे व्रत आणि उपवासापेक्षाही हिंदू धर्म शास्त्रात अधिक सांगितलेल आहे. नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्या पूजन केल्यास माता प्रसन्न होते.

   

छोट्या लहान मुलींना मातेचे रूप मानण्यात आलेल आहे आणि म्हणूनच त्यांचं पूजन केल्यास माता प्रसन्न होते, या लहान लहान मुलींना काही भेटवस्तू दिल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले तर माता नक्की प्रसन्न होते. या छोट्या कन्येने आपल्याकडून दिलेली भेट स्वीकार केल्यास ती प्रत्यक्ष मातेनेच स्वीकार केलेली आहे, माताराणीने स्वीकारलेली आहे, अशी मान्यता आहे.

कन्या प्रसन्न झाल्यास माताराणी सुद्धा प्रसन्न होते. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी, कन्या पूजन करण्याचा प्रघात आहे. दररोज कन्यापूजन केल्यास तिला एखादी वस्तू भेट दिल्यास मातेची कृपा बरसते. मात्र जर हे दररोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी सप्तमी तिथी, महाअष्टमी तिथी आणि महानवमीच्या दिवशी आपण कन्या पूजन हे अवश्य करावे. कन्या पूजन केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत हे पूर्ण होत नाही.

आपण ही एक वस्तू या नवरात्रीत कोणत्याही दिवशी एखाद्या कन्येस द्या, देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. सुख समृद्धी निर्माण होईल. जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती सुद्धा होईल. सकाळी किंवा सायंकाळी पूजा करताना एक पूर्ण नारळ म्हणजेच ज्यामध्ये पाणी आहे, पाणी असलेला नारळ ज्याला केसर आहे, तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे, ज्या ठिकाणी माता विराजमान आहेत तिथे जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हे वाचा:   नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात? बघा या दिवशी ज'न्मलेले मुल घराण्यासाठी खूप भाग्यशाली असते..

शक्यतो नंदादीप या दिवसात आपण लावतच असतो, अगरबत्ती लावायचे आहे. मातेला कुंकू लावायचा आहे आणि मातेसमोर प्लेटमध्ये ठेवलेला जो नारळ आहे, मातेच्या कपाळी लावलेलं कुंकू आपण वापरून नारळावरती स्वस्तिक काढायच आहे. हे सर्व करत असताना या मंत्राचा उच्चार करत रहा. जेणेकरून देवीतत्त्व जागृत होईल ,

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंत्रात एक वेगळं सामर्थ्य असते,मंत्रजप खूप महत्त्वाचा असतो. नंतर नैवेद्य दाखवून प्रार्थना करा. अजून एक मंत्र जो आपण अगदी पूर्ण नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त वेळा जप करावा. हा देवीचा बीजमंत्र आहे. हा मंत्र खूप फलदायी आहे.

ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करा. या मंत्राद्वारे आपण महासरस्वती महाकाली महालक्ष्मी माता यांची कृपा प्राप्त करतो. त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. मोठ्यांत मोठी समस्या दूर होते. जप पूर्ण श्रद्धा भक्तीने देवीचे स्मरण करून करा.

नारळ आपण आपल्या हातात घ्यायचा आहे. आपल्या कपाळाला स्पर्श करायचा आहे. मग नारळ खाली ठेवून हात जोडून देवीसमोर प्रार्थना करा, की आम्ही हे श्रीफळ आपल्या चरणी अर्पण करत आहोत. आपण या नारळाच्या स्त्रीत्वाचा स्वीकार करा आणि आमच्या जीवनात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य निर्माण करा. सुरू असणाऱ्या संकटांच्या मालिकेतून सुटकेचा मार्ग दाखव.

हे वाचा:   तळहातावरील अशा रेषा लॉटरी लागण्याचे देतात संकेत..जाणून घ्या आपल्या हातावर अशा रेषा आहेत का..भाग्यवान व्यक्ती असतात असे लोक..

तो नारळ जागृत झाला, विधिवत पूजा झाली आता कन्येला तो स्वीकार झाला तर मातेचं फळ मिळालं असं म्हणायचं. कन्या ही दहा वर्षाची असावी, त्यांनाच आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार कन्या असे मानतो, त्यांच्यामध्येच नवदुर्गा वास करत असतात, कन्येच पूजन करा, मग हे श्रीफळ दिल्यानंतर तिचा आशीर्वाद घ्या, कारण कन्येचे आशिर्वाद म्हणजेच देवीचा आशीर्वाद.

घरामध्ये सुख-समृद्धी येते. श्रीफळा सोबतच थोडेसे पैसे 11/21/51/101 रुपये त्या श्रीफळासोबत द्या, यामुळे नवदुर्गा सोबतच माता लक्ष्मी प्रसन्न होतात. लक्ष्मीची कृपा राहते. नवरात्रीतील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. सर्व दिवस देवीला समर्पित असतात व देवी तत्व खूप जागृत असते.

पण स्त्रीला मा’सिक ध’र्म चालू असेल तर त्या पाच दिवसांमध्ये त्यांनी कृपया हा उपाय करू नये, कारण कोणत्याही देवपूजेमध्ये मासिक ध’र्म हे व र्ज्य असतात तसेच या नऊ दिवसांच्या कालावधीत कोणत्याही बालिकेचा किंवा स्त्रीचा महिलेचा अपमान करू नये. देवीचं आशीर्वाद सदैव आपणा सर्वांच्या पाठीशी राहो हीच देवी चरणी प्रार्थना. आपल्या घरी असणारी दारिद्रता निघून जाते. कधीही स्त्रियांचा अपमान करू नये.

Leave a Reply