ज्या घरात या 5 वस्तू असतात त्यांना श्रीमंत बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही..घरात पैसा खेचून आणण्यासाठी या गोष्टी घरात अवश्य ठेवा..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आणि रहावं अस वाटत असतं. प्रत्येकजण त्यांच्या परीने कष्ट करून जगत असतात व श्रीमंत बनण्यासाठी धडपडत असतात. या पाच वस्तू जर तुम्ही घरी ठेवल्या तर तुम्ही नक्की खूप श्रीमंत व्हाल. लक्ष्मीची कृपा, धनधान्य, संपदा, वैभव आणि प्रतिष्ठा जर घरात टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करुन पहा, या पाच वस्तू तुमच्या घरात आहेत की नाहीत याची पडताळणी करा.

   

या पाच वस्तू जर घरी असतील तर तुमच्या घरी लक्ष्मीचा वास सदैव राहतो. या वस्तू म्हणजे घरात सुख समाधान राखून ठेवतात.

१. गणेशाची मूर्ती:- ज्यांना अग्रस्थानी पूजेला मान आहे असे सर्वांचे लाडके आपले बाप्पा, गणपती, श्री गजानन, सर्वांचे आराध्य असे गणपती बाप्पा यांची मूर्ती अशा प्रकारे घरी स्थापन करा की मूर्तीची नजर तुमच्या मुख्य दरवाज्यावरती राहील.

सकाळी उठल्यावर प्रथम दर्शन विघ्नहर्ता गणरायाचे घ्या आणि प्रसन्न सुरुवात करा. माता लक्ष्मी सह गणपती स्वतः नेहमी तुमच्या घरी वास करतील. जर घरात वादविवाद होत असतील तर नृत्य करणारी गणपतीची मूर्ती स्थापन करा.

हे वाचा:   वाईट काळ संपणार 2022 मध्ये सर्वात जास्त लकी ठरतील या सहा राशी..या राशींचे नशीब पालटणार..

२. बासरी:- श्रीकृष्णाने वाजवलेली, मनाला मोहित करणारी, मन प्रसन्न ठेवणारी ही बासरी असते. माता लक्ष्मीचे हे आवडते वाद्य आहे कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार होते त्यामुळे ज्या घरात बासरी असते तिथे माता लक्ष्मीचा वरदहस्त नेहमी असतो. माता लक्ष्मीला चांदीची बासरी अत्यंत प्रिय आहे.

3. दक्षिणावर्ती शंख:- माता लक्ष्मीच्या हातातील एक प्रिय वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. हा शंख तुम्ही तुमच्या देवघरात दररोज पुजायचा आहे. लाल वस्त्रात लपेटून दररोज देवपूजेसोबत हा शंख पुजायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते.

४. लक्ष्मी कुबेर प्रतिमा:- आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मीची प्रतिमा असते, लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच भगवान कुबेर जे धनाचे स्वामी, देवांच्या खजिन्याचे खजिनदार मानले जातात असे भगवान कुबेर. म्हणून कुबेराची प्रतिमा सुद्धा घरी असणे गरजेचे असते. लक्ष्मी कुबेर यांची प्रतिमा घराच्या उत्तर भिंतीवर लावावी कारण ते उत्तर दिशेचे मालक आहेत. कुबेराची पूजा केल्याने घरातील धन वृद्धिंगत होते.

हे वाचा:   आंघोळ न करता स्वयंपाक बनवत असाल तर नक्की पहा, विचारही केला नसेल अशा गोष्टी घडतात...

५. कापूर:- देवपूजा झाल्यावर नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ कापूर प्रज्वलित करावा. कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. ज्या घरामध्ये नित्यनियमाने कापूर जाळला जातो तिथे लक्ष्मी सदैव वास करते. दररोज सकाळी देवपूजा झाल्यावर घराच्या मध्यम भागी तुम्ही हा कापूर जाळायचा आहे.

तर वरील या 5 वस्तू आपल्या घरी असणे खूप शुभ असते. यांमुळे आपल्या घरात सकारत्मक उर्जा राहते, घरात नेहमी आनंदी वातावरण राहत असते. तर आपण देखील या 5 गोष्टी आपल्या घरात अवश्य ठेवाव्यात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply