नमस्कार मित्रांनो,
अनेकदा आपल्या घराच्या भिंतीमध्ये किंवा कुठेही कोपऱ्यामध्ये पिंपळाचे रोपटे उगवतात. हिंदू ध र्म शास्त्रात या पिंपळाच्या वृक्षास अत्यंत पवित्र अत्यंत शुभ मानले जाते. मात्र हा वृक्ष घरासमोर लावण्यास घराच्या अवतीभोवती लावण्यास हिंदू ध र्म शास्त्रात मनाई केलेली आहे. वास्तू शास्त्रानुसार सुद्धा पिंपळाचे झाड आपल्या घराच्या आसपास असणे किंवा अगदी पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडणं अत्यंत अशुभ मानलं जातं.
त्यामुळे आपल्या घरावर अनेक घोर संकटे येऊ शकतात घरामध्ये कदाचित अश्या काही अनपेक्षित गोष्टी घडतात की ज्या अत्यंत अशुभ असतात ज्याची आपण कल्पना ही करू शकत नाही. महत्वाचा प्रश्न असा आहे पिंपळाचे रोपटे उगवल्यावर ते नक्की उपटाव का आणि उपटून दुसरी कडे लावायच असेल किंवा त्या रोपट्याच विसर्जन करायचं असेल तर ते कोणत्या वारी करावं. हिंदू ध र्म शास्त्र याबद्दल नक्की काय बोलत जाणून घेवूयात.
हिंदू ध र्म शास्त्रानुसार जर तुमच्या वास्तूच्या आसपास पिंपळाचे रोपटे उगवलेले असेल तर लवकरात लवकर हे रोपटं त्या ठिकाणाहून उपटून ते दुसरीकडे कुठे तरी लावावं. मग तुम्ही एखाद्या मंदिराच्या जवळपास लावू शकता किंवा रस्त्याच्या दोन्ही कडेला अगदी कुठेही लावलं तर अति उत्तम आहे. किंवा एखाद्या शेताच्या बांध्यावर लावला तरी ही चालेल. मात्र पिंपळाचे रोपटे उपटल्यानंतर ते दुसरीकडे नक्की लावा.
जर तुम्हाला असे करणे शक्य नसेल तर तुम्ही हे झाड मुळापासून उपटू शकत नसेल तर ते रोपटे अर्ध्यातून उपटून, कापून त्याचे विसर्जन जवळपासच्या जलस्रोतात करू शकता. मग नदी असेल सरोवर, तळे त्या ठिकाणी त्या रोपट्याचे श्रद्धापूर्वक आपण विसर्जन करू शकता. मात्र यासाठी रविवारचा दिवस उत्तम मानलेला आहे रविवारच्या दिवशी जर आपण पिंपळाचे रोपटे त्या ठिकाणाहून उपटून दुसरीकडे जर लावलं. तर त्याचा कोणताही दोष आपल्याला किंवा आपल्या कुटुंबास लागत नाही.
मात्र बऱ्याचदा अस दिसत की हे रोपटे एकदा उपटल्यांतर पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी पिंपळाचे रोपटं उगवते. अश्यावेळी आपण एक छोटासा उपाय करू शकतात. रविवारच्या दिवशी हे रोपटं उपटण्यापूर्वी एक साबुत लिंबू त्या वर एकही डाग नाही असा एक लिंबू आणि त्याच्यासोबत एक हिरवी मिरची आपण त्या रोपट्याजवळ ठेवायची आहेत 3 तास हा लिंबू आणि मिरची त्याच ठिकाणी असेल.
आणि 3 तास झाल्यानंतर या लिंबू व मिरची सहित हे रोपटे उपटून आपण ते दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे ज्या ठिकाणी रोपटे लावाल त्या ठिकाणी लिंबू आणि मिरची त्याच ठिकाणी आपण ठेवायची आहे. जर रोपटं पाण्यात प्रवाह करणार असाल तर पिंपळाच्या रोपट्या सोबत लिंबू व मिरची सुद्धा प्रवाहित करा. असे केल्याने त्या ठिकाणी नंतर कधी पिंपळाचे वृक्ष उगवणार नाही.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.