“ फक्त व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…” ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हे नाव अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

   

सिनेविश्वात तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र अचानक झालेल्या एका घटनेनंतर महिमाचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महिमाने चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला होता.

महिमा चौधरी ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी महिमा चौधरीने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला होता. यात तिने सिनेसृष्टीत कशाप्रकारे अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नकार दिला जातो, याबद्दल भाष्य केले होते.

हे वाचा:   इंटरनेटवर व्हायरल झाली संजय कपूरच्या मुलीचे फोटो; फोटो पाहून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

यावेळी महिमा म्हणाली, “मला असे वाटते की आता चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी रुळावर आली आहे. आता अभिनेत्रींना योग्य भूमिका आणि चित्रपटात त्यांच्या योग्य सीन्स दिले जात आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदलाही मिळत आहे. तसेच त्यांच्याकडे पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या ऑफर्स येत आहेत.”

“पण पूर्वी चित्रपटसृष्टीत ही स्थिती नव्हती. त्यावेळी सिनेसृष्टीही पुरुषप्रधान असायची. त्या काळात अभिनेत्रींच्या रिलेशनशिपचा परिणाम त्यांच्या कामावर व्हायचा. जर तुम्ही कुणाला तरी डेट करताय हे कळताच त्याबाबत चर्चा सुरु व्हायच्या.

अनेकदा त्याबद्दल लिहिले जायचे. कारण व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच एखादी भूमिका करण्यास प्राधान्य दिले जायचे. यात अशा अभिनेत्रींनाही प्राधान्य असायचे ज्यांनी आजवर किस केलेले नाही.” असेही तिने सांगितले.

“पण आता अनेक गोष्टी बदलत असल्याचे महिमाने सांगितले आहे. आजकाल तुम्ही कुणाला डेट करता याचा तुमच्या कामावर परिणाम होत नाही. प्रोफेशनल लाइफ आणि प्रायवेट लाइफ दोन्ही वेगळे ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असल्याचे महिमाने सांगितले.”

हे वाचा:   सारा आणि जान्हवी कपूर पेक्षाही खूपच सुंदर आहे गोविंदाची मुलगी, पहा तिचे फोटो....

दरम्यान २०१६ पासून महिमा अभिनयापासून लांब झाली. २०१६ मधला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आता ती अनुपम यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply