22 वर्षीय पृथ्वी शॉच्या आयुष्यात सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल `रब ने बना दी जोडी`

मनोरंजन

Prithvi Shaw Viral Photos : भारताचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नुकतंच न्यूझीलंड ए (IND A vs NZ A) विरुद्ध खेळताना दमदार कामगिरी केली. याआधी आयपीएलमध्येही (IPL) पृथ्वी शॉने अगदी कमी वयात आपली छाप उमटवली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात त्याला संधी मिळाली नसली तरी इतर स्पर्धांमध्ये तो मैदान गाजवतोय. पृथ्वी शॉ सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. आपल्या चाहत्यांना नेहमीच तो अपडेट देत असतो.  19 वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकवणारा पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यात एका अभिनेत्रीसमोर क्लीन बोल्ड झाला आहे.

   

पृथ्वी शॉने नवरात्रीत गरबा शिकत असतानाचे काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पृथ्वीला गरबा शिकवणारी ती सुंदर मुलगी कोण? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांनी होती. त्या मुलीची चर्चा सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. पृथ्वीला गरबा शिकवणाऱ्या त्या मिस्ट्री गर्लचे नाव आहे निधी तापडिया (Nidhi Tapadia). पृथ्वी आणि निधी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 

हे वाचा:   रीमा लागू यांची मुलगी अप्सरासारखीच सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देते स्पर्धा

कोण आहे निधी तापडिया?निधी तापडिया ही इंस्टाग्राम (Instagram) सेन्सेशन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. निधी एक मॉडेल आहे, ती आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळते. निधी तापडियाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 102K फॉलोअर्स आहेत.

काही दिवसांपूर्वी  पृथ्वीने निधीबरोबरच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोबरोबरच त्याने हार्ट इमोजीही टाकला होता. त्यामुळे पृथ्वी शॉ निधी तपाडीला डेट करत असल्याची चर्चा होती. पण याबाबत दोघांनीही खुलासा केलेला नाही. याआधी पृथ्वी शॉचं नाव टीव्ही अॅक्ट्रेस प्राची सिंग हिच्याबरोबर जोडलं जात होतं. दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता.

पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्दपृथ्वी शॉ आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना श्रीलंकेविरुद्ध 2021 जुलैमध्ये खेळला होता. या सामन्यात पृथ्वी गोल्डन डकचा शिकार झाला होता. यानंतर आयपीएल 2022 मध्येही त्याला मोठी कामगिरी करता आली नाही. 10 सामन्यात त्याने केवळ 283 धावा केल्या.

Leave a Reply