राज कुंद्रा बरोबर लग्न करायला तयार नव्हती शिल्पा शेट्टी; तेव्हा तयार झाली जेव्हा राज कुंद्रा यांनी…

मनोरंजन

सध्या राज कुंद्रा प्रकरण खूप मोठमोठे वळणे घेत आहे. अ’श्लील चित्रपट बनवण्याच्या केस मध्ये त्यांच्या समस्या ह्या आणखी वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत राज शिल्पा शेट्टीसोबत आपल्या प्रेमकथेविषयी काही गोष्टी शेअर करत आहे. या मुलाखतीत राज यांनी सांगितले होते की शिल्पाशी त्यांची पहिली भेट त्याच्या मॅनेजरमार्फत झाली होती.

   

त्यावेळी शिल्पाने यूके रिएलिटी शो बिग ब्रदर जिंकला होता आणि तिची लोकप्रियता खूप जास्त झाली होती. राज तिच्याकडे परफ्यूम बनवण्याच्या कल्पनेने गेले आणि इथेच त्यांनी शिल्पाचे मन जिंकले. तेव्हा त्यांनी पहिल्याच भेटीत आईच्या पायाला स्पर्श केला होता. राजने या मुलाखतीत सांगितले होते की शिल्पाला त्याच्यासोबत प्रेमसंबंधात रस नाही.

हे वाचा:   “मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे”; शाळेत असताना स्मिता गोंदकरला मित्राने केलेलं प्रपोज, अभिनेत्री म्हणालेली….

राज यांनी सांगितले की जेव्हा मला हे समजले की शिल्पा माझ्या प्रेमात पडू शकते तेव्हा मी तिच्या मागे लागलो होतो. मी असा विचार केला होता की चला आपण एक प्रयत्न तर करुया. पण शिल्पा स्पष्टपणे म्हणाली, राज, असं होणार नाही, मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. ती खूप कडक स्वभावाची आहे. मी तिला विचारले की असे का होणार नाही? तर ती म्हणाली, मी मुंबई सोडू शकत नाही, मी भारत सोडू शकत नाही आणि तू लंडनमध्ये राहतोस.

पुढे राज यांनी सांगितले की, यानंतर मी निर्माता वशु भगनानी यांना फोन केला आणि सांगितले की मला मुंबईत मालमत्ता हवी आहे. त्यांनी मला सांगितले की जुहू येथे एक प्रॉपर्टी आहे, मी ती प्रॉपर्टी पाहिल्याशिवाय खरेदी केली आणि १० मिनिटांनी शिल्पाला फोन करून म्हणालो, तुम्ही म्हणताय की तुम्ही बॉम्बेमध्ये राहणार आहात, तुम्हाला श्री बच्चन यांचे घर माहितच असेल मी त्यांच्या घरासमोर एक घर घेतले आहे, आता बोला.

हे वाचा:   दरवाजाची कडी लावून एकट्यानेच बघा या वेब सिरीज; बोल्ड कन्टेन्ट चा मिळेल खजाना.!

राज यांच्या या बोलण्याने शिल्पाचे हृदय जिंकले होते आणि तिने लग्न करण्यास होय असे सांगितले. 2000 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि आता त्यांना दोन मुले आहेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply