जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेला भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवही म्हटले जाते. सचिन तेंडुलकरची गणना सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. एकट्या त्यांच्या बंगल्याची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
एकेकाळी छोट्याशा घरात राहणाऱ्या सचिनने स्वप्नातही विचार केला नव्हता असे सर्व छंद पूर्ण केले आहेत. त्यांच्याकडे अतिशय आलिशान बंगले आणि वाहने आहेत. वोगच्या वृत्तानुसार, सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये मुंबईतील बंगला 39 कोटी रुपयांना विकत घेतला होता, आज त्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे.
हा बंगला 1920 साली बांधण्यात आला होता, ज्याची मालकी एका पारशी कुटुंबाकडे होती. हा बंगला सचिनने विकत घेतल्यानंतर पुन्हा बांधण्यात आला. सुमारे 6000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या तीन मजली बंगल्याच्या तळघरात 40-50 कार पार्क करण्यासाठी जागा आहे.
बंगल्यात स्विमिंग पूलसह जिम देखील आहे. सचिनने त्याच्या बंगल्याचा 100 कोटींचा वि”मा उतरवला आहे. याशिवाय कुर्ला, वांद्रे येथे त्यांचा फ्लॅट आणि केरळमध्ये वॉटर फेसिंग हाऊस आहे.
स्पोर्ट्स कीडा वेबसाइटच्या बातमीनुसार, सचिनचे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमजवळ एक घर आहे, ज्यातून स्टेडियम दिसते, सचिन अनेकदा सुट्टीसाठी तिथे जातो. सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघासाठी बराच काळ खेळला आणि त्याचे चाहते देशभर आणि जगभरात पसरलेले आहेत.