गौतमी पाटीलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलरची चाललेय सगळीकडेच बोंबाबोंब; बघा डान्स अन अभिनयाची जुगलबंदी….

मनोरंजन

सबसे कातिल गौतमी पाटील कोणत्या कोणत्या कारणामुळं सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी तरूण वर्ग वाटेल ते करताना दिसतो. तिच्या कार्यक्रमाला पुरूष वर्गा इतकीच महिला वर्गाची देखील चर्चा होताना दिसते. आता गौतमी पाटील मोठ्या पड्यावर तिच्या नृत्याची आणि अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे. तिचा घुंगरू सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिच्या डान्सचं तर कौतुक होतयचं पण तिथकचं कैतुक तिच्या अभिनयाचे देखील होत आहे. चाहत्यांनी तिच्या पहिल्या सिनेमाचा टिझर पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

   

स्त्री म्हणून अन्याय झालेल्या एक लावणीसम्राज्ञीची भूमिका घुंगरू सिनेमात गौतमी पाटील साकारताना दिसणार आहे.काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या या पहिल्या वहिल्या सिनेमाबद्दल माहिती दिली होती. गौतमी म्हणाली होती की, माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा.

तिच्या सिनेमाचा ट्रेलर इतका भारी आहे की, तिच्या चाहत्यांना सिनेमाबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमा रिलीज कधी होणार याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण गौतमी पाटीलला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

हे वाचा:   नीता अंबानींनी खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार, किंमत जाणून त्यांचे पती मुकेश अंबानींना देखील बसला धक्का

गौतमीनं तिच्या इन्स्टाला तिच्या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. यावर एकानं कमेंट करत म्हटलं आहे की,महाराष्ट्रातच नाही तर आख्या देशात नंबर 1 राहील तुझा मोव्ही गौतमी❤️तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,गौतमी म्हणल्या वर मूव्ही हिट तर होणारच ना 🔥.. नाद च खुळा 😎 सबसे कातील गौतमी पाटील ✌️💝..अशा असंख्य कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

सध्या जत्रा- यात्रा सुरू आहेत. गावगावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला लोकांची तुफान गर्दी होताना दिसते. कधी कधी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागतो. गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Leave a Reply