देखण्या रवींद्र महाजनींबद्दल मुलगा गश्मीरने केलं असं वक्तव्य, “मी स्मार्ट आहे, पण बाबा…”

मनोरंजन

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथे आंबी नावाचं गाव आहे, तिथे ते भाड्याने राहत होते. रवींद्र महाजनींचं घर आतून बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

   

रवींद्र महाजनी हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या काळातील हँडसम हंक असलेल्या रवींद्र महाजनी यांनी मुलाबरोबर तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटात ते झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने या बाप-लेकाने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत आपण वडिलांइतके देखणे नसल्याचं गश्मीर म्हणाला होता.

हे वाचा:   रश्मिका जेव्हा विजयसोबत घा"णेर"डे काम करून तासनतास रडायची; म्हणाली "मला घरच्यांशी बोलताही येत नव्हते.."

“माझे बाबा त्यांच्या काळात खूप देखणे होते. मला नाहीत वाटत मी त्यांच्याइतका देखणा आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय, मी स्मार्ट आहे, माझा एक वेगळा चार्म असेल जो मुलींना आणि कदाचित मुलांनासुद्धा आवडत असेल. पण एक परफेक्ट लूक असतं, जे बाबांमध्ये होतं, तेवढं माझ्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. मला फ्रेश दिसायचं आहे, माझी बॉडी फिट ठेवायची आहे, माझे बेस्ट अँगल्स कोणते आहेत ते कॅप्चर करायचे आहेत. मी स्क्रीनवर जास्त चांगला कसा दिसेन, यासाठी माझे प्रयत्न असतात. पण बाबांना कधीच हा प्रयत्न करावा लागला असेल असं मला वाटत नाही. कारण ते आधीच देखणे होते, त्यांना दैवी देणगीच होती,” असं गश्मीर वडिलांबाबत म्हणाला होता.

हे वाचा:   'अशा प्रकारे अभिनेत्रींचा वापर केला जायचा..' जुने दिवस आठवून मंदाकिनीने केले दुःख व्यक्त.!

दरम्यान, रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे इथे नेण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply