शाहरुख खान शेवटचा पठाणमध्ये दिसला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता चाहते त्याच्या जवानची वाट पाहत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच अटली कुमार दिग्दर्शित चित्रपटाचा प्रिव्ह्यू देखील सोमवारी रिलीज झाला, त्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर जवानच ट्रेंड करत आहे. या चित्रपटाचं बजेट 220 कोटींच्या घरात आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच तमिळ स्टार्स नयनतारा आणि विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहेत. जवानच्या प्रिव्ह्यू रिलीजनंतर चित्रपटप्रेमींनी यातील काही सीन्सची तुलना इतर चित्रपटांसोबत केली आहे. त्यामुळेच सध्या साऊथचे दिग्दर्शक अटली यांच्यावर कंटेन्ट चोरीचा आरोप करण्यात येत आहे.
अलीकडेच ट्रेड अॅनालिस्ट मनोजबाला विद्यावलन यांनी शाहरुखच्या चित्रपटाविषयी ट्विट केले असून त्यात त्यांनी याआधीच्या काही चित्रपटांचे पोस्टर पोस्ट केले आहेत. त्याला जवानबाबत नेटकऱ्यांचं म्हणणं जाणून घ्यायचं होतं. त्यांनी लिहिले, #JawanPrevue इतर चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन जवानचे दिग्दर्शक अॅटलीबद्दल तुमचे विचार काय?’ असं विचारलं. त्यानंतर सोशल मीडियावर हे स्क्रीन शॉट्स तुफान व्हायरल होऊ लागले.
जवान’ च्या टिझर मधील शाहरुखचा लुक मून नाइट, डार्कमॅन, द लायन किंग, शिवाजी: द बॉस, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि KGF च्या या चित्रपटांमधील काही सीन्सशी मिळता जुळता आहे. पण दिग्दर्शक ऍटलीच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलं नसून, त्यांच्यावर याआधीही कंटेन्ट चोरीचे आरोप झाले आहेत.
या यादीत थलपथी विजयचा पहिला नंबर येतो. 2019 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात विजयसोबत नयनतारा दिसली होती. महिला फुटबॉल संघावर आधारित शिवाच्या लघुपटातून बिगिलची कथा कॉपी करण्यात आल्याचे सांगितले जाते. चित्रपट निर्माते शिवा यांनीही लेखक संघाकडे तक्रार केली होती.
अटली दिग्दर्शित 2017 च्या चित्रपटात थलपथी विजय आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या मुख्य भूमिका होत्या. रजनीकांत यांच्या मूंद्रू मुगम या चित्रपटाच्या कथेची नक्कल केल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यावर करण्यात आला होता. त्यानंतर नयनतारा, जय आणि आर्या अभिनीत, राजा राणी या चित्रपटातून अटलीने दिग्दर्शनात पदार्पण आहे. रिलीज झाल्यानंतर, चाहत्यांनि या चित्रपटाची तुलना मणिरत्नमच्या मौना रागमशी केली होती.
थलपथी विजय आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर थेरी हा एटली कुमारचा दुसरा चित्रपट आहे. 2016 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट एका डीसीपीची कथा आहे जो आपल्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी भूमिगत होतो. त्याच्या आयुष्यावर संकट आल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडते. एटली यांच्यावर विजयकांत यांच्या छत्रिया या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप होता. त्यामुळे आता शाहरुखच्या जवान विषयी चाहत्यांना नेमकं काय वाटतं हे पाहणं महत्वाचं आहे.