‘लस्ट स्टोरीज 2’ साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक.? Vijay Varma म्हणाला, “आता माझ्या आयुष्यात दुसरीच….”

मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांचा जानेवारी महिन्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडीओ न्यू इयर सेलिब्रेशन करत नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा होता. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले. दरम्यान, आता तमन्नानं खुलासा केला आहे की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही ‘लस्ट स्टोरीज 2’ च्या सेटवर झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांचा हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान, त्यांच्या रिलेशनशिपवर काही नेटकऱ्यांनी पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. तर विजय वर्मानं हा पब्लिसीटी स्टंट नाही तर तमन्नावर खरंच प्रेम करतो.

   

‘जीक्यू इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मानं या सगळ्या गोष्टींविषयी विचारण्यात आलं. त्यात एक म्हणजे तमन्ना आणि तो खरंच कपल आहेत की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. यावर उत्तर देत विजय म्हणाला की आता हे स्पष्ट झालं आहे की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यानं तमन्नासाठी असलेल्या त्याच्या भावना सांगितल्या आणि म्हणाला की तो तिच्या प्रेमात वेडा आहे. विजय म्हणाला, “आता हे काही प्रमाणात समजतंय की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी आनंदी आहे आणि प्रेमात वेडा झालो आहे. मी याला माझ्या आयुष्यातील खलनायक युग संपला असून रोमांसं युग सुरु झाल्याचं म्हणतो.”

हे वाचा:   रोमँटिक सिन करताना मर्यादा ओलांडून बसले होते हे ५ अभिनेते.. शूटिंग चालू असताना अभिनेत्रींच्या.......

या दरम्यान, गेल्या महिन्यात ‘फिल्म कंपेनियन’ लाा दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटिया म्हणाली होती की कोणती व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीकडे यामुळे आकर्षित होते कारण ती व्यक्ती आपली सह-कलाकार आहे, असं तिला वाटतं नाही. याविषयी बोलताना तमन्ना म्हणाली, “मला वाटतं की जर कोणाला कोणावर प्रेम करायचं असेल, कोणत्या व्यक्तीसाठी काही फील करायचं असेल, तर ती एक पर्सनल फीलिंग आहे. त्याचा या गोष्टीशी काहीही एक संबंध नाही की ती व्यक्ती आपली सह-कलाकार आहे म्हणून प्रेमात पडतो.”

तमन्ना विजयसोबतच्या तिच्या रिलेशनशिपविषयी बोलताना म्हणाली की ती आणि विजय खूप चांगल्या प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्या दोघांना कोणत्याच गोष्टीसाठी अडचणी येत नाही. तमन्ना यावेळी म्हणाली की “तो एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल मला फार मनापासून काळजी वाटते. तो सोबत असला की मी फार आनंदात असते. तो माझी ‘हॅपी प्लेस’ आहे.

Leave a Reply